Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : लग्नानंतर हनिमूनला जाणार नाहीत विकी कौशल आणि कॅटरिना कैफ, समोर आलं असं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 04:34 PM 2021-11-11T16:34:19+5:30 2021-11-11T16:37:33+5:30
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding News: विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे डिसेंबर महिन्यामध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगली आहे. या दोघांच्या विवाहाबाबत दररोज नवनवे अपटेस समोर येत असतात. आता तर दोघांच्या हनिमूनबाबतही माहिती समोर आली आहे. विकी कौशल आणि कॅटरिना कैफ सध्या त्यांच्यातील रिलेशन आणि विवाहाच्या वृत्तामुळे चर्चेत आहेत. हे दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत.
त्यांच्या विवाहाबाबत दररोज नवनवे अपडेट येत असतात. ताजा माहितीनुसार हे दोघेही विवाहानंतर हनिमुनला जाणार नाहीत.
समोर येत असलेल्या रिपोर्टनुसार कॅटरिना कैफ ही याबाबत काहीही लपवून ठेवू इच्छित नाही. लवकरच ती याबाबतची अधिकृत माहिती देणार आहे.
लग्नानंतर कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हनिमून ब्रेकवर जाणार नाहीत. कारण दोघेही आपापल्या कामामध्ये बिझी आहेत. त्यामुळे ते हनिमूनसाठी जाणार नाहीत.
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग करणार आहेत.