अभिनेत्याकडे काम नव्हतं, अकाऊंटमध्ये होते फक्त १८ रुपये; आज आहे इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 02:48 PM2024-08-20T14:48:53+5:302024-08-20T15:07:04+5:30

कामासोबतच अभिनेता त्याच्या फॅशन सेन्ससाठीही चर्चेत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की अभिनेत्याने असा काळही पाहिला आहे जेव्हा त्याच्याकडे काम नव्हतं. त्याबाबत जाणून घेऊया...

अभिनेता विजय वर्माने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो आज इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय स्टार आहे. मिर्झापूर, डार्लिंग, लस्ट स्टोरीजसारख्या प्रोजेक्टसाठी ओळखला जातो.

विजय वर्मा अभिनेत्री तमन्ना भाटियाला डेट करत आहे. कामासोबतच अभिनेता त्याच्या फॅशन सेन्ससाठीही चर्चेत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की अभिनेत्याने असा काळही पाहिला आहे जेव्हा त्याच्याकडे काम नव्हतं. त्याबाबत जाणून घेऊया...

बंबल इंडियाशी संवाद साधताना विजय म्हणाला की, "मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मी आर्थिकदृष्ट्या खूपच लो फेज पाहिली. माझ्याकडे काम नव्हतं आणि मी कामाचा विचार करायचो, त्यासाठी प्रयत्न करत होतो."

"माझ्याकडे काम नसल्यामुळे मी खचलो होतो. ही ती लो फेज होती आणि हे वर्षानुवर्षे चालू राहिलं. ते फक्त जगणं होतं आणि कधी कधी तर खूपच वाईट होतं" असं म्हणत भावना व्यक्त केल्या.

"मी बहुतेक वेळा पैसे नसताना डेटिंग केलं होतं. जर ही माझी पहिली डेट असेल आणि मी मुलीला बाहेर फिरायला जाण्याबाबत विचारलं असेल तर मी तिच्याशी चांगलं वागलं पाहिजे हा पहिला नियम होता."

"अशाही काही मुली होत्या ज्या मी बिल भरल्यावर नाराज व्हायच्या" असं सांगत डेटिंगचा अनुभव शेअर केला. Galatta Plus शी बोलताना अभिनेता म्हणाला, "मी नेहमी माझी भूमिका वर ठेवतो पण मी याआधी लो फेजमध्ये होतो."

"माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या अकाऊंटमध्ये फक्त १८ रुपये होते. तेवढ्यात एका रोलसाठी फोन आला. छोट्या रिपोर्टरची भूमिका आहे, असं ते म्हणाले. एक दिवसाचे काम आणि तुम्हाला ३००० रुपये मिळतील."

"असा रोल मला कधीच करायचा नव्हता, पण मी तो रोल केला. मी गेलो आणि शूटिंग सुरू केलं. माझं मन लागत नव्हतं. मी टेकमध्ये फंबल करत होतो" असं विजय वर्माने म्हटलं आहे.

अभिनेता विजय वर्मा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तो नेहमीच त्याचे जबरदस्त फोटो शेअर करत असतो. त्याचे असंख्य चाहते आहेत.