एमी पुरस्कार सोहळा होस्ट करणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, पहिला भारतीय ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 01:54 PM2024-09-13T13:54:39+5:302024-09-13T14:09:57+5:30

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्काराला टेलिव्हिजनचा ऑस्कर पुरस्कार म्हणतात. हा पुरस्कार टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. अकादमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस (ATAS) द्वारे एमी पुरस्कार दिला जातो.

यंदाचा 52 वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा (International Emmy Awards 2024) येत्या 25 नोव्हेंबर 2024 रोजी न्यूयॉर्क शहरात पार पडणार आहे.

हा जगप्रसिद्ध सोहळा होस्ट करण्याची जबाबदारी एका भारतीय अभिनेत्यावर सोपवण्यात आली आहे.

ज्या अभिनेत्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा रोवला आहे, त्याचं नाव आहे वीर दास (Vir Das). वीर दास हा एक स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता आहे.

वीर दास हा 52 व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांचे होस्टींग करणार आहेत. असे करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

वीर दास हा 52 व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांचे होस्टींग करणार आहेत. असे करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

वीर दास यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यानं लिहिलं, "एक भारतीय एमी होस्ट म्हणून तुमच्या समर्थनासाठी धन्यवाद. मी या वर्षी Emmys होस्ट करण्यासाठी उत्सुक आहे. भारीच...मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद अत्यंत सन्मानित आणि उत्साही आहे". त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचे अभिनंदन केलं आहे.

भारताचं नाव उंचावण्याची वीर दासची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने 51 व्या एमी आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात (International Emmy Awards 2023) भारताचा डंका गाजवला होता.

वीर दासला त्याच्या विनोदाच्या टायमिंगसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळालेला आहे. नेटफ्लिक्सच्या (Netflix) 'वीर दास लँडिंग' (Vir Das : Landing) या कार्यक्रमासाठी त्याला गेल्या वर्षीच्या एमी पुरस्कार सोहळ्यात गोरवण्यात आलं होतं.

अभिनेता म्हणून वीर दासने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये दिल्ली बेली, गो गोवा गॉन, लव्ह आज कल आणि शिवाय यांसारख्या उत्तम चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. अक्षय कुमारच्या नमस्ते लंडनमधून वीरने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होतं.

वीर दासला सिनेमापेक्षा जास्त प्रसिद्धी त्याला स्टँडअप कॉमेडीमधून मिळाली आहे. त्याचे जगभरात कॉमेडी शो होतात. वीर दासने शंभरहून अधिक स्टँडअप कॉमेडी शो केले आहेत.

वीर दासचं वादाशी नातं आहे. वीर दासने अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीमध्ये स्टँड अप कॉमेडी शो दरम्यान 'मी अशा भारतातून आलोय...' ही एक कविता सादर केली. या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

कवितेमध्ये वीर दासने भारताबद्दल अपमानास्पद गोष्टी म्हणल्या आहेत, असं अनेकांचं मतं होतं. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. तेव्हा नेटकऱ्यांनी त्यांच्यावर भारतविरोधी असल्याचा आरोपही केला. यावरून त्याला खूप ट्रोलही करण्यात आले. एवढंच नाही तर त्याला दहशतवादीदेखील संबोधलं होतं.