Virat-Anushka Wedding Anniversary: विराट-अनुष्काच्या लग्नाला ४ वर्ष पूर्ण; दोघांनी खास शब्दात एकमेकांना दिल्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 05:43 PM2021-12-11T17:43:22+5:302021-12-11T17:55:59+5:30

Virat-Anushka Wedding Anniversary: क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाला आज ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्या दोघांनी एकमेकांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)च्या लग्नाला आज ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्या दोघांनी एकमेकांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

विराट कोहलीने अनुष्का सोबतचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत आणि स्पेशल मेसेजही लिहिला आहे. फोटोत विराट आणि अनुष्का यांच्याव्यतिरिक्त ११ महिन्यांची त्यांची लेक वामिकादेखील दिसली. नेहमीप्रमाणे या फोटोतही तिचा चेहरा दिसत नाही.

विराट कोहलीने मेसेजमध्ये म्हटले की, चार वर्षांपासून तू माझे जोक्स आणि आळस झेलत आहेस. तू मला आहे तसे स्वीकारले आहे. चार वर्षांपूर्वी जीवनात सर्वात मोठी भेट मिळाली. चार वर्ष लग्नाचे ज्यात त्या मुलीची साथ मिळाली जी खूप प्रामाणिक, प्रेमळ, शूर आहे आणि नेहमीच मला योग्यरित्या उभे राहण्यासाठी शिकवते मग संपूर्ण जग माझ्या विरोधात असेल तरी.

विराटने पुढे म्हटले की,तू मला सर्वप्रकारे पूर्ण करतेस. मी नेहमीच तुझ्यावर असेच प्रेम करत राहीन. ही अॅनिव्हर्सरी खूप खास आहे कारण वामिकाच्या येण्यामुळे आपले कुटुंब पूर्ण झाले आहे.

अनुष्का शर्माने विराट कोहली सोबतचे काही फनी फोटोदेखील शेअर केले आहेत. यासोबत तिने लेकीचा देखील फोटो शेअर केला आहे.

अनुष्काने विराटसोबतचे काही फोटो शेअर करून स्पेशल मेसेज लिहिला आहे. तिने म्हटले की, नेहमीच मला प्रोत्साहन दिलेस त्यासाठी मी आभारी आहे. यापूर्वीदेखील मी म्हटले आहे की जे लोक तुम्हाला ओळखतात ते नशीबवान आहेत. आशा करते की प्रेम, आदर आणि जसे एकमेकांना मार्गदर्शन करतो, तसेच राहू दे.

त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे लग्न ११ डिसेंबर, २०१८ साली इटलीत पार पडले.

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अनुष्का आणि विराट लग्नबंधनात अडकले.

विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.

विराट आणि अनुष्काची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

विराट आणि अनुष्काचे चाहते त्यांच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे.