Year Ender 2024 : या वर्षी जन्मलेल्या सेलिब्रेटींच्या मुलांची नावे एकदम युनिक, जाणून घ्या Starkids च्या नावांचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 15:57 IST2024-12-20T15:37:24+5:302024-12-20T15:57:46+5:30

आपल्या मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी असावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. बॉलिवूड स्टार्सनी आपल्या मुलांची नावे खूप विचारपूर्वक ठेवली आहेत.

Year Ender 2024: 2024 हे वर्ष अनेक गोड-कडू आठवणींनी भरलेलं होतं. या वर्षी अनेक स्टार्सनी जगाचा निरोप घेतला आणि तर अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. या वर्षात पालक झालेल्या कलाकारांनी आपल्या मुलांची नावं अगदी सुंदर ठेवली आहेत. जे सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आणि चर्चेत राहिले. अभिनेत्री दीपिका पादुकोण-रणवीर सिंगची मुलीपासून विराट कोहली-अनुष्का शर्माच्या मुलापर्यंतच्या नावांचा या यादीत समावेश आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासाठी हे वर्ष खूप चांगलं राहिलं. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे (८ सप्टेंबर २०२४) आई-बाबा झाले. या जोडप्यानं आपल्या बाळाचं नाव 'दुआ' ठेवलं आहे. "दुआ म्हणजे प्रार्थना.

वरुण धवन आणि नताशा दलाल (Varun Dhawan & Natasha Dala) यांच्या मुलीचे नावही खास आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल 3 जून 2024 रोजी आई-बाबा झाले. त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचं नाव 'लारा' ठेवले आहे. 'लारा' हा लॅटिन, ग्रीक आणि रशियन शब्द आहे. नावाचा अर्थ 'सुंदर' आणि 'तेजस्वी' असा आहे. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये या नावाचे वेगवेगळे अर्थ आहेत. प्राचीन इजिप्शियन पौराणिक कथांमध्ये 'लारा' म्हणजे सूर्याचे किरण. त्याचवेळी रोमन भाषेत 'लारा'चा अर्थ अप्सरा आणि देवतांचा संदेशवाहक असा होतो. ग्रीकमध्ये याचा अर्थ 'देवांचा दूत' असा होतो.

यामी गौतम-आदित्य धर यांच्याघरीदेखील या वर्षात नव्या पाहुण्याचं आगमन झालं. यामी (Yami Gautam) आणि आदित्य 10 मे 2024 रोजी पालक झाले. या जोडप्याने त्यांच्या छोट्या राजपुत्राचे नाव 'वेदविद' ठेवले. 'वेदविद' या शब्दाचा अर्थ वेद जाणणारा असा होतो. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने आपल्या मुलाचे नाव 'वेदविद' का ठेवले? हे सांगितलं होतं. यामी म्हणाली, "आमच्या मुलाचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी झाला, म्हणून आम्ही त्याचे हे नाव ठेवले"

अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाला जन्म दिला. आपल्या लाडक्या लेकाचं नाव विराट आणि अुष्काने 'अकाय' असं ठेवलं. 'अकाय' (Akay) या शब्दाचा अर्थ पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या रात्रीचा झगमगता प्रकाश किंवा पूर्ण चंद्र असा होता. तसेच संस्कृतमध्ये याचा अर्थ ' शरीर नसलेलं रूप' असं होतो.

बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या घरी लग्नाच्या दोन वर्षानंतर 16 जुलै रोजी मुलीचा जन्म झाला. त्यांच्या मुलीचे जुनैरा इदा फजल असे आहे. नावाचा अर्थ असा आहे की, 'गायडिंग लाइट'. जुनैरा हे अरबी नाव असून गायडिंग लाइट म्हणजेच मार्ग दाखवणारा प्रकाश असा या नावाचा अर्थ आहे.

१२वी फेल स्टार विक्रांत मेसी हा ७ फेब्रुवारीला एका मुलाचा पिता झाला. त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'वरदान' ठेवले आहे. वरदानचा अर्थ आशीर्वाद (देवाने दिलेला आशीर्वाद) असा आहे.

अमला पॉल- जगत देसाई हे देखील यावर्षी (11 जून 2024) पालक झाले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव इलई ठेवलं . जो तामिळ शब्द आहे. याचा अर्थ देव शंकर यांचा मुलगा 'कार्तिकेय' किंवा 'मुरुगन' असा होता.

अलिकडेच अभिनेत्री सोनाली सेहगलच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. तिनं आपल्या मुलीचं नाव 'शुकर' ठेवलं आहे. पंजाबमध्ये या नावाचा अर्थ आभारी असणं आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा १५ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रोहित आणि रितीका यांना मुलगा झाला आहे. रोहित आणि रितिकाने त्यांच्या मुलाचं नाव अहान ठेवल्याचं समजतं. रोहितच्या मुलाच्या नावाचा अर्थ खूपच खास आहे. अहान हे नाव संस्कृत शब्द ‘अहा’ पासून आले आहे. याचा अर्थ ‘जागणे’ असा होतो. अहान नावाचा अर्थ आहे- पहाट, सूर्योदय, प्रकाशाचा पहिला किरण.