'The Kashmir Files'चे दिग्दर्शक पत्नी पल्लवी जोशीसोबत नव्या घरात झाले शिफ्ट; पाहा Inside Photos...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 19:31 IST2022-12-03T12:55:10+5:302022-12-03T19:31:05+5:30
विवेक अग्निहोत्रींनी २००५ मध्ये 'चॉकलेट' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. पण 'द काश्मीर फाईल्स' मधून त्यांना ओळख मिळाली.

२०२२मध्ये आलेल्या द काश्मीर फाईल्स सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. २५ कोटींमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने २५० कोटींची कमाई केली.
इस्राइलचे दिग्दर्शक नादव लॅपिडने यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा प्रपोगंडा व वल्गर चित्रपट म्हटलं होतं, त्यानंतर देशभरातलं वातावरण तापलं होतं. इस्राइलचे राजदूत नाओर गिलोन यांनी याबाबत माफी मागितली होती. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आयुष्यात या चित्रपटाचे महत्त्व खूप मोठे आहे.
काश्मीर फाईल्सच्या यशानंतर विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी मुंबईतल्या त्यांच्या नव्या अपार्टमेंटमध्येमध्ये शिफ्ट झाले.
इकोनॉमिक्स टाईम्स रिपोर्टनुसार, विवेक अग्निहोत्री यांनी १७.९२ कोटीमध्ये घर खरेदी केलं आहे. कार पार्किंगसह या घराचा कार्पेट एरिया ३२५८ स्क्वेअर फूट आहे. या घराची किंमत ५५ हजार रुपये प्रती स्क्वेअर फूट असल्याचं बोललं जात आहे.
विवेक अग्निहोत्री यांचं नवं घर मुंबईच्या वर्सोवा भागात आहे. याच बिल्डिंग ३१ व्या माजल्यावर बिग बी अमिताभ बच्चन यांचादेखील फ्लॉट आहे.
30 व्या माळ्यावर असलेल्या या घरासाठी विवेक अग्निहोत्री यांनी जवळपास १.०७ कोटी रुपये स्टँम्प ड्युटी भरली. आली आहे. विवेक यांच्या नव्या घरात अनेक खोल्या, एक डायनिंग हॉल आणि किचनजवळ एक विस्तीर्ण बाल्कनी आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्या नव्या घरात सुंदर बेडरूम आहेत ज्यात त्यांनी हलके रंग वापरले आहेत. येथे पुरेसा सूर्यप्रकाश येतो आहे.
विवेक अग्निहोत्रीने आपल्या घरात हलक्या रंगांचा अधिक वापर केला आहे. त्याचे घर अतिशय आलिशान आहे.
त्याच्या नवीन अपार्टमेंटमध्ये लक्झरी ड्रॉईंग रूम आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी घरामध्ये रोपेही लावली आहेत ज्यामुळे घराला नॅचुरल इफेक्ट्स मिळेल.