Mouni Roy Wedding : मौनी की शादी... ! पाहा, मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस नांबियारच्या लग्नाचे सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 01:42 PM2022-01-27T13:42:23+5:302022-01-27T16:27:52+5:30

Mouni Roy Wedding Pics: मौनी व सूरजने गोव्यात मल्याळी आणि बंगाली रितीरिवाजाप्रमाणे लग्न केलं. या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते.

मौनी रॉय अखेर लग्नबंधनात अडकली. आज गोव्यात सूरज नांबियारसोबत तिने लग्नगाठ बांधली.

मौनी व सूरजच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत मौनी कमालीची सुंदर दिसतेय.

मौनी व सूरजने गोव्यात मल्याळी आणि बंगाली रितीरिवाजाप्रमाणे लग्न केलं. या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते.

लग्नात मौनीचा पारंपारिक लूक पाहायला मिळाला. पांढरी सिल्क साडी आणि त्यावर सोन्याचे दागिणे अशा तिच्या लूकची जबरदस्त चर्चा आहे.

साऊथ इंडियन वधूच्या रूपात मौनी कमालीची सुंदर दिसतेय. लग्नाचा मंडप पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आला आहे.

मौनीच्या लग्नाला अभिनेता अर्जुन बिजलानी, मंदिरा बेदी, आशका गोरडिया अशा अनेक सेलिब्रिटींची हजेरी होती.

मंदिरा बेदीने लग्नानंतर नवरा-नवरीसोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात मौनी व सूरजच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.

मौनीचा पती सूरज नांबियार एक बॅकर आहे. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली.

जैन कुटुंबात जन्मलेल्या सूरजने आर.व्ही.अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बी.टेक केले आहे. तसेच, स्टॅनफोर्ड विद्यापीठात गुंतवणूक, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाचा पदविका अभ्यास केला आहे.

सूरजने अशोक इंडिया या कंपनीत इंटर्न म्हणून काम केले होते. सध्या तो इन्व्हिक्टस म्हणून एका प्रसिद्ध इंजिनीअरिंग अँड बिजनेस डेव्हलपमेंट कंपनीत कार्यरत आहे. तो, असोसिएशन ऑफ चार्टर्ड अल्टरनेटिव इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिस्टचा सदस्य असून, युएईमधील कॅपिटल मार्केटचा डायरेक्टर हेड आहे.

सूरजला ट्रॅव्हलिंग आणि बाईक रायडिंगची आवड आहे. त्याचं इन्स्टा अकाऊंट पाहिल्यावर हे लक्षात येतं.

सूरज व मौनीची ओळख कशी झाली तर दुबईत. लॉकडाऊनमध्ये मौनी रॉय आणि सूरज एकमेकांना प्रथमच भेटले.

लॉकडाऊनदरम्यान मौनी दुबईत अडकली होती. या दिवसांत ती तिच्या बहिणीच्या घरी होती. बहिणीच्या माध्यमातून तिची सूरजसोबत ओळख झाली आणि यानंतर मौनी आणि सूरजची जवळीक वाढली.