अमिताभ बच्चन यांना सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते? KBC 16 मध्ये बिग बींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 03:27 PM2024-09-13T15:27:52+5:302024-09-13T15:57:57+5:30

KBC 16 मध्ये स्पर्धकाशी बोलताना बिग बी कोणत्या गोष्टीला जास्त घाबरतात, याचा खुलासा त्यांनी केलाय (amitabh bachchan, kbc 16)

अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून ओळखले जातात. अमिताभ सध्या KBC 16 चं सूत्रसंचालन करत आहेत. या मंचावर बिग बी त्यांच्या आयुष्यातले अनेक किस्से उलगडत असतात.

अमिताभ यांनी KBC 16 च्या मंचावर त्यांना कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटते याचा उलगडा केला. अमिताभ यांनी मनमोकळेपणाने समोरच्या स्पर्धकाशी बोलताना ही गोष्ट सांगितली.

बिग बी सर्वात जास्त झुरळाला घाबरतात असं ते म्हणाले. KBC 16 मध्ये प्रणिती पेदपती ही स्पर्धक सहभागी झाली होती. त्यांच्याशी बोलताना बिग बींनी झुरळाबद्दलची मनातली भीती सांगितली

अमिताभ यांनी याविषयी किस्सा सांगितला की, "झुरळ कधीच मरत नाहीत. मी एकदा एका बॉटलमध्ये किटकनाशक टाकून मोठ्या प्रयासाने त्यात झुरळाला पकडलं."

अमिताभ पुढे म्हणाले, "झुरळाचा विषय इथेच थांबला नाही. मी सहा दिवसांनी ती बॉटल पुन्हा उघडून बघितली. बॉटल उघडताच ते झुरळ तिथून उडून गेलं."

अमिताभ यांनी झुरळाविषयीचा हा किस्सा सांगताच KBC 16 चा मंच आणि प्रेक्षक खळखळून हसायला लागले. अमिताभ यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मिश्किल अंदाजात सर्वांची मनं जिंकली.

KBC 16 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धक प्रणिती पेदपती यांनी २५ लाखाच्या प्रश्नावर खेळ सोडला. १२ लाख ५० हजार ही विजयी रक्कम घेऊन प्रणिती यांनी खेळातून माघार घेतली