माधुरी दीक्षितच्या मागे लागली होती दाऊदची गँग, हत्येची सुपारी दिली अन्...; नेमकं काय झालं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:27 IST2025-04-04T15:55:36+5:302025-04-04T16:27:26+5:30

डी कंपनी माधुरी दीक्षितच्या पाठीही पडली होती. जर्नालिस्ट जितेंद्र दीक्षित यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला.

अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडचे संबंध असल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे. दाऊद इब्राहिमचं नावही अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.

ही डी कंपनी माधुरी दीक्षितच्या पाठीही पडली होती. जर्नालिस्ट जितेंद्र दीक्षित यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला.

ते म्हणाले, "ही ९०च्या दशकातील घटना आहे. पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी माधुरी दीक्षितचे प्राण वाचवले होते. त्यांनीच मलादेखील हे सांगितलं".

"माधुरी दीक्षितला अनिश इब्राहिम दुबईला येण्यासाठी प्रेशराइज करत होता. त्याचे वाईट हेतु होते".

"तो अनेक अभिनेत्रींना बोलवायचा. त्यांना महागडे गिफ्ट द्यायचा. माधुरी दीक्षितवरही त्याची नजर होती".

"पण, माधुरी दीक्षित त्याच्यापुढे झुकली नाही. तिने दुबईला जाण्यास नकार दिला. यामुळे अनिश इब्राहिम भडकला".

"त्याने माधुरी दीक्षितला संपवायचं तिची हत्या करायची असं ठरवलं. ही माहिती क्राइम ब्रांचला मिळाली".

"त्यानंतर क्राइम ब्रांचने माधुरी दीक्षितला सुरक्षा दिली. डी कंपनीच्या हालचालींवर त्यांची नजर होती. यामुळे काही वर्षांसाठी माधुरी दीक्षित परदेशात राहत होती".