कांचा चीना आणि कात्यासारख्या भूमिका अजरामर करणारे Danny Denzongpa आजकाल कुठे आहेत? By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 01:17 PM 2022-01-15T13:17:57+5:30 2022-01-15T13:26:27+5:30
Danny Denzongpa : डॅनी डेंज़ोंग्पा आपल्या दमदार अभिनयाने आणि तेवढ्याच दमदार आवाजाने हिरोला हादरवून सोडायचे. त्यांनी वेगवेगळ्या सिनेमात वेगवेगळ्या भूमिका केल्या, पण त्यांनी साकारलेले व्हिलन अधिक लोकप्रिय आहेत. बॉलिवूडचे सिनेमे हे व्हिलनशिवाय अधर्वट वाटतात. ८०-९० च्या दशकात तर व्हिलनची इतकी क्रेझ होती की, बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक व्हिलन आले. हिरो इतकीच व्हिलनची दमदार भूमिका असायची. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक भारी व्हिलन झाले आहेत. त्यातीलच एक म्हणजे डॅनी डेंज़ोंग्पा. डॅनी डेंज़ोंग्पा आपल्या दमदार अभिनयाने आणि तेवढ्याच दमदार आवाजाने हिरोला हादरवून सोडायचे. त्यांनी वेगवेगळ्या सिनेमात वेगवेगळ्या भूमिका केल्या, पण त्यांनी साकारलेले व्हिलन अधिक लोकप्रिय आहेत. ते पडद्यावर कितीही कठोर दिसत असले तरी प्रत्यक्षात ते फारच कमी बोलणारे आणि मृदू स्वभावाचे आहेत.
डॅनी डेंज़ोंग्पा यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४८ मध्ये सिक्कीमच्या युकसोममध्ये झाला होता. त्यांचं पूर्ण नाव 'शेरिंग फ़िनसो डेंज़ोंग्पा' हैं. डॅनी 'भुटिया' जमातीतील आहेत. भुटिया त्यांची मातृभाषा आहे. त्यांचं शिक्षण नैनातीलमधून झालं. नंतर त्यांनी दार्जिलिंगमधून पदवी घेतली. कॉलेज संपल्यावर त्यांचं सिलेक्शन आर्मीमध्ये झालं होतं. पण त्यांच्या आईने नकार दिला.
डॅनी डेंज़ोंग्पा यांना बालपणापासूनच गायनाची आणि अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी याच क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. यावेळी त्यांना लूक आणि नावावरून टोमणे मारले गेले. यादरम्यान त्यांची भेट जया भादुरीसोबत झाली. त्यांची चांगली मैत्री झाली. जया यांनीच त्यांचं डॅनी हे नाव ठेवलं.
डॅनी डेंज़ोंग्पा यांनी १९७१ मध्ये बी.आर.इशरा यांच्या 'जरूरत' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. यात त्यांनी हिरो-हिरोइनचा मित्र डॅनीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांना गुलजार यांच्या मेरे अपनेमध्ये रोल मिळाला. त्यांना खरी ओळख मिळाली ती बी. आर. चोप्रा यांच्या धुन सिनेमातून. यानंतर त्यांनी 'फ़कीरा', 'चोर मचाए शोर', 'देवता', 'कालीचरण', 'बुलंदी आणि 'अधिकार' सिनेमात सकारात्मक भूमिका साकारल्या.
१९७५ मध्ये रमेश सिप्पीने डॅनी यांना 'शोले'मधील गब्बर सिंहचा रोल ऑफर केला होता. पण डेट्समुळे ते हा सिनेमा करू शकले नाहीत. यानंतर त्यांना मोठ्या बजेटचे सिनेमे 'आशिक़ हूं बहारों का', 'पापी', 'बंदिश', 'द बर्निंग ट्रेन' आणि 'चुनौती' मध्ये निगेटिव्ह रोल्स मिळाले. डॅनी खलनायक म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांचे 'कत्या', 'बख़्तावर' आणि अग्निपथ मधील 'कांचा चीना' हे रोल खूप गाजले.
डॅनी डेंज़ोंग्पा यांनी ७० ते ९० च्या दशकात अनेक सिनेमात अभिनेता, व्हिलन, सेकंड लीड रोल आणि कॉमेडिअन म्हणून काम केलं. यादरम्यान 'धुंध', '36 घंटे', 'बंदिश', 'जियो और जीने दो', 'धर्म और क़ानून', 'अग्निपथ', 'हम', 'ख़ुदा गवाह', 'घातक', सनम बेवफ़ा आणि 'बरसात' सारख्या सिनेमातून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. आजही त्यांना डॅनीपेक्षा 'कांचा चीना', 'बख़्तावर', 'शेर ख़ान' आणि 'कात्या' नावाने जास्त ओळखलं जातं.
डॅनी डेंज़ोंग्पा यांनी बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडच्या सिनेमातही काम केलं. हॉलिवूडच्या 'Seven Years in Tibet' मध्ये ते ब्रॅड पिटसोबत दिसले होते. डॅनी यांनी केवळ अभिनयच केला असं नाही त्यांनी सिनेमांचं दिग्दर्शन देखील केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'फिर वही रात' सिनेमा टॉप सर्वात चांगल्या हॉरर सस्पेन्स सिनेमांपैकी एक आहे.
डॅनी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ते अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम गायक, चित्रकार, लेखक आणि मूर्तीकार आहेत. त्यांनी काला सोना सिनेमात आशा भोसले यांच्यासोबत गाणं गायलं आहे. त्यांनी लता मंगेशकर, मोहम्मद रफ़ी, किशोर कुमार आणि एस. डी. बर्मन यांच्यासोबतही गाणी गायली आहेत. बॉलिवूडमध्ये येण्याआधी ते नेपाळी गाणी गात होते. आतापर्यंत त्यांनी २०० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. (Image Credit : Filmfare)
डॅनी यांची सिक्कीममध्ये बीअर कंपनी आहे. Yuksom Breweries असं या कंपनीचं नाव आहे. डॅनी या कंपनीतून दरवर्षी बीअरचे ३० लाख केस विकतात. Yuksom Breweries भारतातील तिसरा सर्वात मोठा बीअर ब्रॅन्ड आहे. डॅनी यांनी याची सुरूवात १९८७ मध्ये केली होती. ते सध्या सिक्कीममध्ये आपल्या कंपनीची देखरेख करतात. ते एकूण २२३ कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.