Ankit Tiwari: आशिकी २ मधील प्रसिद्ध गायक अंकित तिवारी कुठे आहे? प्रेयसीकडून बलात्काराच्या आरोपानंतर जगतोय असे आयुष्य By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 01:09 PM 2022-03-06T13:09:01+5:30 2022-03-06T13:29:29+5:30
Ankit Tiwari not sung a song After 2015: सुन रहा हैना तू..., तुम ही हो... या गाण्यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अंकितच्या आयुष्यात भूकंप झाला होता. आज अंकित अनेकांच्या स्मृतीपटलावरूनही गायब झालेला आहे. याचा परिणाम असा झाला की त्याने २०१५ ते आजतागायत एकही गाणे गायले नाही. बॉलिवूडचा गाजलेला चित्रपट आशिकी २ मधून अवघ्या सिनेरसिकांवर आपल्या आवाजाची मोहिनी घालणारा गायक अंकित तिवारी सध्या कुठे आहे? ना त्याचे कोणते नवीन गाणे कोणी ऐकले ना त्याची खबरबात. सुन रहा हैना तू..., तुम ही हो... सारखी गाणी या सिनेमामध्ये आहेत.
या गाण्यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अंकितच्या आयुष्यात भूकंप झाला होता. आज अंकित अनेकांच्या स्मृतीपटलावरूनही गायब झालेला आहे. त्याच्या प्रेयसीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून त्याने एकही गाणे गायलेले नाही.
आशिकी-2 (Aashiqui 2) हा सिनेमा २०१३ मध्ये आला होता. त्याने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला होता. परंतू त्यानंतर वर्षभरातच अंकितच्या खासगी आयुष्यातही वादळ आले होते. त्याच्यावर प्रेयसीने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
अंकितच्या भावावर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. या घटनेचा परिणाम अंकितच्या आयुष्यावर एवढा झाला की त्याने २०१५ ते आजतागायत एकही गाणे गायले नाही.
अंकितचे आईवडील कानपूरचे. त्यांची "राजू सुमन अँड पार्टी" नावाचे संगीत मंडळ होते. तिथे अंकित गायचा, नंतर त्याने शास्त्रीय संगिताचे धडे घेतले. वाद्ये वाजवायला शिकला आणि २००७ मध्ये मुंबई गाठली.
मुंबईत आल्यानंतर अंकित तिवारीने प्रदीप सरकार यांची भेट घेतली. त्यावेळी प्रदीप सरकार त्यांच्या आगामी चित्रपटावर काम करत होते. मात्र, काही कारणास्तव त्याचा चित्रपट रखडला आणि सरकारने अंकित तिवारीला जिंगलवर काम करण्याची संधी दिली.
जिंगल्ससोबतच अंकित तिवारीने टीव्ही कार्यक्रमांसाठी संगीतही तयार करायला सुरुवात केली. मात्र, हबीब फैसलला भेटल्यानंतर अंकितला चित्रपटांसाठी गाण्याची संधी मिळाली. अंकित तिवारीने 'आशिकी 2', 'तेरी गल्लीं', 'सुन रहा है ना तू' सारखी गाणी गायली. जी सुपरहिट ठरली.
अंकितच्या प्रेयसीने लावलेल्या आरोपांवर न्यायलयात केस सुरु होती. २०१७ मध्ये पुराव्यांअभावी अंकित आणि त्याच्या भावाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
आता अंकित काय करतो? बलात्काराच्या आरोपांतून सुटल्यावर अंकितने 2018 मध्ये कानपूरमध्ये पल्लवी शुक्ला हिच्याशी लग्न केले. मात्र, तोवर अंकितला बलात्काराच्या आरोपांनी संपवून टाकले होते. २०१५ पासून अंकितने एकही गाणे गायलेले नाही. लग्नानंतर अंकितला एक मुलगी झाली आहे.
आता अंकित पुन्हा एन्ट्री करण्याच्या प्रयत्नात आहे. तो आणि त्याची पत्नी स्टारप्लसवरील एका शोमध्ये स्मार्ट जोडी म्हणून दिसणार आहेत. यानंतर अंकित पुन्हा श्रोत्यांसाठी गाणे गातो की त्याच्या सध्याच्या आयुष्यात निघून जातो, हे येणारा काळ ठरविणार आहे.