कुठे आहे 'पापा कहते हैं'ची स्वीटी आनंद? इंडस्ट्रीला केलं रामराम, बनलीय गुगल इंडियाची हेड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 09:17 AM2024-07-17T09:17:49+5:302024-07-17T09:22:49+5:30

निळे डोळे आणि किलर स्माईलने अभिनेत्री मयुरी कांगोने लाखो लोकांना तिचे चाहते बनवले होते. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने लाखो हृदयांवर राज्य करणारी अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे.

होगी प्यार की जीत, पापा कहते हैं हे चित्रपट आठवत असतील ना. हा चित्रपट प्रत्येकाने एकदा तरी पाहिला असेल. या चित्रपटात मयुरी कांगो मुख्य भूमिकेत दिसली होती.

मोठी अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मयुरी इंडस्ट्रीत आली होती पण तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिला कळले की इथे तग धरणे सोपे नाही.

जेव्हा तिचे चित्रपट चांगले चालले नाहीत तेव्हा ती योग्य वेळी इंडस्ट्रीतून बाहेर पडली. एक्झिटचा निर्णय मयुरीसाठी योग्य ठरला आणि आता ती करोडो रुपये कमावत आहे.

नसीम या चित्रपटातून मयुरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिचा अभिनय आवडला आणि महेश भट यांनी तिला पापा कहते हैं की या चित्रपटासाठी साइन केले.

याशिवाय मयुरीचा आणखी एक चित्रपट हिट झाला आणि तो होता होगी प्यार की जीत. पण याशिवाय तिचा एकही चित्रपट चालला नाही आणि तिला काम मिळणे कठीण झाले.

जेव्हा चित्रपटांमध्ये काम नव्हते, तेव्हा मयुरीने टेलिव्हिजनवरही हात आजमावला. तिने नर्गिस, थोडा गम थोडा खुशी, डॉलर बाबू आणि किट्टी पार्टी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले पण तिला इथेही प्रसिद्धी मिळाली नाही.

त्यानंतर तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मयुरीने एका एनआरआयशी लग्न केले आणि ती अमेरिकेत शिफ्ट झाली.

लग्नानंतर मयुरीने अमेरिकेत एमबीए केले आणि तिथेच तिला पहिली नोकरीही मिळाली. त्यानंतर, २०१९ मध्ये, मयुरीच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि ती गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली.

सोशल मीडियावर तिने अनेकवेळा चाहत्यांना तिच्या ऑफिसची झलकही दाखवली आहे. मयुरी आता भारतात शिफ्ट झाली असून तिला एक मुलगाही आहे.