कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 09:56 AM 2024-10-13T09:56:04+5:30 2024-10-13T10:01:32+5:30
बाबा सिद्दिकींची इफ्तार पार्टी हा चर्चेचा विषय होता. बाबा सिद्दिकींनी या इफ्तार पार्टीतच शाहरुख आणि सलमान खानमधील वाद मिटवत त्यांची गळाभेट घालून दिली होती. अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला.
यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. सलमान खानने सिद्दिकी यांच्या हत्येबाबत समजताच बिग बॉसचं शूटिंग रद्द करत लगेचच रुग्णालयात धाव घेतली.
बाबा सिद्दिकी यांचे बॉलिवूड सेलिब्रिटींशी जवळचे संबंध होते. वांद्रे परिसरात त्यांचं कामकाज असल्याने आणि याच भागात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहत असल्याने त्यांचं बॉलिवूड कनेक्शन पाहायला मिळायचं.
त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावायचे. बाबा सिद्दिकींची इफ्तार पार्टी हा चर्चेचा विषय होता.
बाबा सिद्दिकींनी या इफ्तार पार्टीतच शाहरुख आणि सलमान खानमधील वाद मिटवत त्यांची गळाभेट घालून दिली होती.
२००८ साली शाहरुख आणि सलमानमध्ये कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीदरम्यान मतभेद झाले होते. त्यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर सलमान आणि शाहरुख फारसे एकत्रही दिसले नाहीत.
बाबा सिद्दिकी यांनी पुढाकार घेऊन सलमान आणि शाहरुखमधील हा वाद मिटवला होता. २०१३ साली बाबा सिद्दिकींनी त्यांच्या इफ्तार पार्टीला या दोघांनाही आमंत्रित केलं होतं.
या इफ्तार पार्टीतच बाबा सिद्दिकींनी सलमान-शाहरुखला एकत्र आणत त्यांच्यातील वाद मिटवले.
बाबा सिद्दिकी यांनी १९७७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. नगरसेवक ते राज्यमंत्री असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे.
१९९९, २००४ आणि २००९ असे तीन वेळा ते वांद्रे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आले होते. २००४ साली ते राज्यमंत्रीही होते.
अलिकडेच बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकीदेखील राजकारणात सक्रिय आहे.