मराठमोळी राधिका आपटेचा नवरा आहे तरी कोण? लग्नाच्या १२ वर्षांनंतर होणार आई-बाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 05:22 PM2024-10-17T17:22:15+5:302024-10-17T17:51:14+5:30

Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटे लवकरच आई होणार आहे. तिने ही गुड न्यूज बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली आहे.

अभिनेत्री राधिका आपटे लवकरच आई होणार आहे. तिने ही गुड न्यूज बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली आहे.

अभिनेत्री राधिका आपटे पहिल्यांदाच आई होणार आहे. तिने बेबी बंपचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सांगितली आहे. प्रत्येकाला तिच्या लग्न आणि पतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

राधिकाचा चित्रपट सिस्टर मिडनाइटचा नुकताच लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रीनिंग पार पडले. त्यावेळेचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत तिचा बेबी बंप पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.

राधिका आपटेच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. २०१२ साली अभिनेत्रीने ब्रिटीश व्हॉयलिन प्लेअर आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले. दोघांनी लग्न जगापासून लपवून ठेवले.

राधिकाने एका मुलाखतीत बेनेडिक्ट टेलरसोबतचे प्रेम आणि लग्नावर भाष्य केले होते. तिने सांगितले होते की, कशी त्यांची भेट झाली आणि मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

राधिका आपटेने मुलाखतीदरम्यान सांगितले की, बेनेडिक्ट टेलरला ती पहिल्यांदा २०११ साली भेटली होती. जिथे ती डान्स शिकण्यासाठी लंडनला गेली होती. काही दिवसांनंतर ते दोघे एकत्र राहू लागले आणि २०१२ साली त्यांनी लग्न केले. त्यानंतर २०१३ साली त्या दोघांनी ऑफिशिएल लग्न केले.

राधिका आणि बेनेडिक्टच्या लग्नाचा एकही फोटो सोशल मीडियावर नाही. याबद्दलही राधिकाने सांगितले होते.

राधिकाने सांगितले होते की, जेव्हा १० वर्षांपूर्वी माझी आणि बेनेडिक्टचे लग्न झाले तेव्हा आम्ही फोटो काढायला विसरलो. आम्ही DIY (डू इट योरसेल्फ) लग्न केले होते. ज्यात जेवण आम्ही स्वतःच बनवले आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत आम्ही नॉर्दनमध्ये लग्न केले.

राधिका म्हणाली होती, आमचे अर्धे फ्रेंड्स फोटोग्राफर होते. मात्र लग्नाचे फोटो कोणी क्लिक नाही केले. आम्ही सगळे नशेत होतो आणि त्यामुळे माझ्याकडे लग्नाचा कोणताच फोटो नाही. जे एकप्रकारे चांगली बाब आहे.

राधिका म्हणाली होती की, संस्मरणीय प्रसंगी फोटो क्लिक करताना बेनेडिक्ट सर्वात वाईट आहे. राधिका म्हणाली, 'माझा नवरा वाईट आहे, कुठलाही फोटो क्लिक करत नाही. पण आता आम्ही जेव्हाही बाहेर जातो तेव्हा तो नक्कीच काहीतरी क्लिक करण्याचा प्रयत्न करतो.