Alka Yagnik : ना मतभेद, ना वाद तरीही पतीपासून 28 वर्षांपासून वेगळ्या राहतात अलका याज्ञिक; पण का? By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 11:45 AM 2023-02-22T11:45:02+5:30 2023-02-22T12:00:04+5:30
Alka Yagnik : अलका अनेक वर्षांपासून पती नीरज कपूर यांच्यापासून वेगळ्या राहतात. दोघं विभक्त झालेत, दोघांचा घटस्फोट झालेला आहे, असं मात्र काहीच नाही. तर यामागचं कारण वेगळंच आहे... तेजाबमधलं ‘एक दोन तीन…’. याच गाण्यावर माधुरी दिक्षितने काही पिढ्यांना भुरळ पाडली. याच गाण्यासाठी अलका याज्ञिक यांनाही पहिलं फिल्मफेअर मिळालं. पण या यशाच्या पाठीमागे अनेक कठोर निर्णय आहेत.
होय, आज आम्ही याचबद्दल सांगणार आहोत. वयाच्या दहाव्या अलका मुंबईत आल्या. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांना पहिला ब्रेक मिळाला आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
कोलकात्यामध्ये जन्मलेल्या अलका याज्ञिक यांनी वयाच्या 6 व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरूवात केली. 1972 पासून त्या आकाशवाणीच्या कोलकाता केंद्रासाठी भजने गात.
एका भेटीत राज कपूर यांना अलका यांचा आवाज अतिशय आवडला. त्यांनी अलका यांची लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत भेट घालून दिली.
1980 मध्ये ‘पायल की झंकार’ या चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून गाण्याची संधी अलका यांना मिळाली. यावेळी त्या केवळ 14 वर्षांच्या होत्या.
यानंतर आठ वर्षांनी आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातील माधुरी दीक्षितवर चित्रीत करण्यात आलेलं ‘एक, दो, तीन...; हे गाणे अलका यांना मिळालं आणि या गाण्याने अलका यांना एक नवी ओळख दिली.
यानंतर गायिका म्हणजे अलका याज्ञिक असे समीकरण जणू रूढ झालं. आपल्या 30 वर्षांच्या करिअरमध्ये अलकांनी 700 चित्रपटांत 20 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत.
अलका अनेक वर्षांपासून पती नीरज कपूर यांच्यापासून वेगळ्या राहतात. दोघं विभक्त झालेत, दोघांचा घटस्फोट झालेला आहे, असं मात्र काहीच नाही. तर यामागचं कारण वेगळंच आहे.
अलका यांनी 1989 साली नीरज कपूर यांच्यासोबत लग्न केलं. मात्र गेल्या 28 पेक्षा अधिक वर्षांपासून त्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. कुठल्या मतभेदामुळे वा वादामुळे नाही तर एका वेगळ्या कारणासाठी.
होय, नीरज व अलका दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील. अलका बॉलिवूडच्या दिग्गज गायिका तर नीरज बिझनेसमॅन. साहजिकच लग्नानंतर अलका मुंबईत राहायच्या तर नीरज हे त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे.
अलका कामातून जसा वेळ मिळेल तशा शिलाँग जात असत, तर कधी कधी नीरज मुंबईत येत. अनेक वर्षे हा ‘सिलसिला’ चालला. यादरम्यान त्यांच्या मुलीचा जन्म झाला.
मुलीच्या जन्मानंतर नीरज यांनी मुंबईला शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बिझनेसमध्ये मोठा तोटा झाला. स्वत:चा बिझनेस आणि अलका यांचं बॉलिवूडमधील करिअर यासाठी अखेर दोघांनी एक कठोर निर्णय घेतला.
अलका यांनीच पतीला शिलाँगमध्ये परतून आपल्या बिझनेसवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आणि पुन्हा ‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’ दोघांच्याही वाट्याला आलं. तेव्हापासून नीरज व अलका वेगवेगळे राहतात. अर्थात त्यांच्यात एक वेगळं बॉन्डिंग आहे. प्रेम आजही कायम आहे.
अलका व नीरज यांना एक मुलगी आहे. जिचं नाव आहे Syesha आहे. तिचं लग्न झालंय. अलका व नीरज एकमेकांसाठी वेळ काढून भेटतात. लाँग डिस्टन्स रिलेशनमध्येही दोघांचा संसार सुखाचा झाला आणि सुरू आहे.