Year Ender 2021: Ahan Shetty ते Palak Tiwari! 2021 मध्ये बॉलिवूडला मिळाले 'हे' नवे चेहरे By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 01:24 PM 2021-12-19T13:24:08+5:30 2021-12-19T13:29:47+5:30
Year Ender 2021:2021 हे वर्ष बॉलिवूडसाठी अनेक कारणांसाठी खास ठरलं. या वर्षात कलाविश्वात अनेक घडामोडी घडल्या. कॉन्ट्रोव्हर्सीपासून ते सेलिब्रिटींच्या लग्नापर्यंत अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या. 2021हे वर्ष बॉलिवूडसाठी अनेक कारणांसाठी खास ठरलं. या वर्षात कलाविश्वात अनेक घडामोडी घडल्या. कॉन्ट्रोव्हर्सीपासून ते सेलिब्रिटींच्या लग्नापर्यंत अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या. यामध्येच काही नवोदित कलाकारांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यामुळे कलाविश्वात झळकणारे हे नवे चेहरे कोणते ते पाहुयात.
क्रिस्टल डिसुझा - छोट्या पडद्यावरील अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा (krystal d'souza) ने मिस्ट्री-थ्रिलर चित्रपट 'चेहरे' मधून कलाविश्वात पदार्पण केलं आहे.
मानुषी छिल्लर - माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने (manushi chhillar) 'पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
इसाबेल कैफ- अभिनेत्री कतरिना कैफची बहीण (Katrina Kaif) इसाबेल कैफ (isabelle kaif) हिचा टाइम टू डान्स हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरणही जवळपास पूर्ण झालं आहे.
पलक तिवारी- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी (shweta tiwari) हिची लेक पलक तिवारीने (Palak Tiwari) विवेक ओबेरॉयसह 'रोजी: द सॅफ्रॉन चॅप्टर' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यापूर्वी तिचा ‘बिजली बिजली’ हा म्युझिक अल्बमही प्रदर्शित झाला आहे.
शर्वरी वाघ - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ (sharvari wagh) हिने ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी, राणी मुखर्जी आणि सैफ अली खान झळकले आहेत.
महिमा मकवाना - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री महिमा मकवाना ( Mahima Makwana) हिने 'अंतिम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटात ती आयुष शर्मासोबत झळकली आहे.
अहान शेट्टी - बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (suniel shetty) याचा लेक अहान शेट्टी (Ahan Shetty) याने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. 'तडप' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. ३ डिसेंबरला १६००पेक्षा जास्त स्क्रीनवर हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट 'आरएक्स 100' या साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे.