Year Ender 2024: ब्रेकअप अन् घटस्फोट! मलायका-अर्जुन ते हार्दिक-नताशा, या सेलिब्रिटींच्या वाट्याला आलं विरहाचं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:40 IST2024-12-16T17:37:28+5:302024-12-16T17:40:59+5:30
२०२४ हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. या वर्षात अनेक कलाकारांचे ब्रेकअप झाले. तर काही सेलिब्रिटी घटस्फोट घेत वेगळे झाले.

२०२४ हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. या वर्षात अनेक कलाकारांचे ब्रेकअप झाले. तर काही सेलिब्रिटी घटस्फोट घेत वेगळे झाले.
यावर्षी सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची. अनेक वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांनी वेगळ्या वाटा निवडल्या.
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला. ४ वर्षांनी हार्दिक-नताशा घटस्फोट घेत वेगळे झाले.
एआर रहमानचादेखील २९ वर्षांचा संसार या वर्षी मोडला. पत्नी सायरा बानूशी घटस्फोट घेत त्यांनी वेगळं झाल्याचं जाहीर केलं.
८ वर्षांच्या सुखी संसारानंतर उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर यांनी घटस्फोट घेतला.
ईशा देओलनेही पती भरत तख्तानीसोबत नातं तोडलं. घटस्फोटानंतर ते दोघे आता वेगळे राहतात.
धनुष आणि ऐश्वर्या या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कपलने २०२२ साली घटस्फोट जाहीर केला होता. यावर्षी त्यांच्या घटस्फोट मंजूर झाला.
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअपचीदेखील प्रचंड चर्चा रंगली.