'तुझे करिअर बर्बाद होईल !'; सैफ अली खानसोबत लग्न करण्याआधी करीना कपूरला दिला होता हा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 01:45 PM2021-12-24T13:45:21+5:302021-12-24T13:54:42+5:30

Saif Ali Khan Kareena Kapoor Love Story: एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी २०१२ साली लग्न केले.

एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांनी २०१२ साली लग्न केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अभिनेत्रीच्या जवळच्यांना सैफ अली खान सोबत लग्न करत असल्याचे समजल्यावर त्यांनी अभिनेत्रीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला.

करीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, लोकांनी तिला इतकेच सांगितले की सैफ घटस्फोटित आहे, दोन मुलांचा बाप आहे, तू खरंच सैफशी लग्न करणार आहेस का?

इतकंच नाही तर करीनाला काही लोकांनी असंही सांगितलं की सैफशी लग्न केल्याने तिचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं.

त्यानंतर करीनाने विचार केला की, प्रेम करणं हा खरंच इतका मोठा गुन्हा आहे का? लग्न झाल्यावर काय होते ते पाहूया.

मात्र, आज सैफ आणि करीना दोघेही इंडस्ट्रीतील पॉवर कपल्समध्ये गणले जातात.

सैफ आणि करीनाला दोन मुले आहेत, मोठ्या मुलाचे नाव तैमूर अली खान आहे, तर लहान मुलाचे नाव जहांगीर अली खान आहे.

करीना कपूर लवकरच लाल सिंग चड्ढा चित्रपटात दिसणार आहे.