zareen khan on comparisons to katrina kaif my career is destroyed due to this comparison
कतरिना कैफमुळे माझे करिअर बर्बाद झाले! जरीन खानने काढली भडास By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 02:21 PM2021-01-31T14:21:51+5:302021-01-31T14:37:32+5:30Join usJoin usNext 11 वर्षानंतर जरीनने केला आरोप बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. हुबेहुब कतरीना कैफ सारखी दिसते म्हणून तिची बरीच चर्चा झाली होती. पण आता हेच कतरीनासारखे रूप जरीनच्या मार्गातील अडथळा ठरला आहे. सतत कतरिनासोबत होत असलेली तुलना जरीनला नकोशी झाली आहे. नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जरीन यावर बोलली. कतरिनामुळे माझे करिअर बरबाद झाले, असे जरीन म्हणाली. आधी मी आईसारखी दिसते, असे लोक म्हणायचे. पण चित्रपटसृष्टीत आले आणि मी कतरिना कैफसारखी दिसते, असे लोक म्हणू लागले, असे ती म्हणाली. आज कोणताही निर्माता-दिग्दर्शक माझ्यासोबत काम करू इच्छित नाही. मी कतरिनासारखी दिसते असे त्यांना वाटते. अशात एका डुप्लिकेटना कोणता निर्माता काम देईन? असा सवाल करत तिने मनातील भडास काढली. मी कतरिना सारखी दिसते, हे गेल्या 11 वर्षांपासून मी ऐकते आहे. याचा माझ्या करिअरवर परिणाम झाला, असेही ती म्हणाली. काही लोकांनी तर मी प्रिती झिंटासारखी दिसते म्हटले. काहींनी मी पूजा भट सारखी दिसते म्हटले. मी जरीन खान आहे, असे लोक कधीच म्हणत नाहीत, असेही ती म्हणाली. प्रत्येकजण बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड असतो. मी सुद्धा त्यापैकीच एक़ पण एका अभिनेत्रीची डुप्लिकेट म्हणून माझ्या माथी शिक्का मारला गेला आणि माझे करिअर बरबाद झाले, असे ती म्हणाली. ‘वीर’नंतर हाऊसफूल २, हेट स्टोरी ३ या सिनेमातही ती दिसली होती. यानंतर मात्र तिचा ‘1921’ हा सिनेमा आपटला. 2017 मध्ये रिलीज झालेला ‘अक्सर 2’ हा सिनेमाही फ्लॉप ठरला. यामुळे तिने पंजाबी व तेलगू सिनेमांकडे मोर्चा वळवला.Read in Englishटॅग्स :जरीन खानकतरिना कैफzareen KhanKatrina Kaif