Bus Bai Bus : 'म्हणून मी बोल्ड भूमिका...'; सायली संजीवचे वक्तव्य आलं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 02:50 PM2022-10-25T14:50:13+5:302022-10-25T14:59:34+5:30

Bus Bai Bus : नुकतीच सायली(Sayali Sanjeev)ने बस बाई बसच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी तिच्याबद्दलचे अनेक मजेशीर किस्से तिच्या चाहत्यांना ऐकायला मिळाले.

काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव. तिचं सोज्वळ सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने मराठी सिनेसृष्टीत स्थान मिळवलं.

नुकत्याच सायलीच्या गोष्ट एका पैठणीची या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तिचा सोज्वळ चेहराच अनेकांना प्रेमात पाडतो.

नुकतीच सायलीने बस बाई बसच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी तिच्याबद्दलचे अनेक मजेशीर किस्से तिच्या चाहत्यांना ऐकायला मिळाले. या शो दरम्यान सायली अनेक गोष्टींवर भाष्य केलं.

मालिका, सिनेमा, तिचं खासगी आयुष्य याबद्दलही ती बोलती झाली. सुबोध भावेने सायलीला तुला एखाद्या बोल्ड भूमिकेसाठी विचारणा झालीये का असं विचारल्यावर तिने तिचं मत जरा स्पष्टंच मांडलं.

त्यावर सायली म्हणाली की, हो. मला सिनेमा नाही तर वेबसीरिजमधील बोल्ड भूमिकेसाठी विचारले होते पण मी नाही सांगितले होते.

त्यावर सुबोध भावे म्हणाला की, बोल्ड होती म्हणून की वेळ नव्हता म्हणून नाही म्हटलेस. त्यावर सायली म्हणाली दोन्ही. कारण मी बोल्ड भूमिकेसाठी मी अजिबात तयार नाही आणि मी माझ्या प्रेक्षकांचा विचार करते.

माझ्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी मला जसे पसंत केले आहे तसे जास्तीत जास्त पोहचवण्याचा प्रयत्न करते. या दृष्टीने मी भूमिकांचा विचार करते आणि माझ्या वाट्याला तशाच भूमिका येतात, असे सायली म्हणाली.

लॉकडाऊननंतर थिएटर्स ओपन झाल्यावर रिलीज झालेल्या झिम्मा सिनेमाने कमाल केली होती. या सिनेमातील सायलीच्या कॅरेक्टरची खास चर्चा झाली होती.

ट्रेलरमधील तिच्या बोल्ड अवताराने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. अंघोळ करतानाच्या त्या सायलीच्या एका सीनमुळे खूप चर्चा झाली होती.