'ही' लोकप्रिय नृत्यांगना आहे कुशल बद्रिकेची पत्नी; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अचंबित By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 07:00 PM 2021-12-31T19:00:00+5:30 2021-12-31T19:00:00+5:30
Kushal badrike: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे कुशल बद्रिकेची लोकप्रियता तुफान वाढली. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदशैलीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके.
मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून कुशल गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे कुशल बद्रिकेची लोकप्रियता तुफान वाढली. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.
सध्या सोशल मीडियावर कुशलच्या कुटुंबियांची चर्चा रंगली आहे. यात त्याची पत्नी कोण? ती काय करते असे असंख्य प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. म्हणूनच, आज आपण कुशलच्या पत्नीविषयी जाणून घेऊयात.
कुशलच्या पत्नीचं नाव सुनैना बद्रिके असं असून ती उत्तम नृत्यांगना आहे.
सुनैना कथ्थक नृत्यांगना असून सोशल मीडियावर ती अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते.
विशेष म्हणजे सुनैना सौंदर्याच्या बाबतीतही अव्वल असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा ती कमी नाही.
सुनैना कथ्थकचे डान्स क्लास घेत असल्याचं सांगण्यात येतं.
अलिकडेच कुशल-सुनैना या जोडीने होम मिनिस्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
कुशल बद्रिके अलिकडेच 'पांडू' या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.