हसताय ना.. म्हणणारा निलेश साबळे ‘चला हवा येऊ द्या’च्या एका एपिसोडसाठी किती फी घेतो माहितीये? By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:49 PM 2022-06-30T13:49:25+5:30 2022-06-30T14:00:01+5:30
Chala Hawa Yeu Dya Fame Nilesh Sable Birthday : आज निलेश त्याचा वाढदिवस साजरा करतोय. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे आणि यात निलेश साबळे या माणसाचं मोठं योगदान आहे. नमस्कार मंडळी... हसताय ना.. हसायलाच पाहिजे... या पहिल्याच वाक्यानं सगळ्यांना जिंकणारा महाराष्ट्राचा लाडका सूत्रसंचालक, कॉमेडियन, लेखक, दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे याचा आज वाढदिवस.
होय, आज 30 जून रोजी निलेश त्याचा वाढदिवस साजरा करतोय. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे आणि यात निलेश साबळे या माणसाचं मोठं योगदान आहे.
आज निलेश साबळे घराघरात ओळखची चेहरा आहे. पण कधीकाळी तो ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायचा. पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर. पण 2010 साली तो मनोरंजन क्षेत्रात आला आणि इथलाच झाला.
2010 साली ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा कार्यक्रम जिंकल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण हा प्रवास अर्थातच सोपा नव्हता. भाडीपाच्या ‘रेडी टू लीड’ या कार्यक्रमात त्याने या प्रवासातील अनेक आठवणी शेअर केल्या आहेत.
निलेशला अभिनयाची आवड होती. पण मेडिकल कॉलेजना अॅडमिशन घेतल्यावर तिथे नाटकाचं अजिबात वातावरण नव्हतं. याचदरम्यान निलेशच्या वडिलांची भोर येथे बदली झाली होती. भोरच्या राजवाड्यात शूटींग चालायचं आणि निलेश तासन् तास त्या वाड्याबाहेर जाऊन उभा राहायचा.
मला आत सोडतील का? मला शूटींग पाहायला मिळणार का? एखादी संधी मिळणार का? असं डोक्यात सुरू असताना एकदा त्याला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून रोल मिळाला. रोल काय होता तर त्याला फक्त चाबकाचे फटके खायचे होते.
निलेशने ते चाबकाचे फटकेही सहज सहन केलेत. कारण जे आजवर स्वप्नं बाळगलं होतं ते पूर्ण होणार होतं. रोल कुठला का असेना तो करायला मिळणार याचा आनंदच मोठा होता.
एकेकाळी चाबकाचे फटके खाणारा, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करणारा निलेश आज मात्र मोठा स्टार बनला आहे. होय, ‘चला हवा येऊ द्या’च्या एका एपिसोडसाठी तो लाखभरापेक्षा जास्त घेत असल्याचं कळतं. रिपोर्टनुसार, एका एपिसोडचे जवळपास सव्वा लाख रुपये घेतो.
‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सुरू झाला होता. आज आठ वर्षांपासून हा शो महाराष्ट्राला हसवत आहे. यातील कलाकारांनी परदेशातही शो केले. मराठीपासून हिंदीपर्यंत अनेक दिग्गजांनी या शोमध्ये उपस्थिती दर्शवली. या शोच्या यशामध्ये निलेश साबळे याचा सिंहाचा वाटा आहे.