Aashram 3: कोण आहे निराला बाबाची साथ देणारा भोपी स्वामी?; 'रंग दे बसंती' सिनेमातही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:16 AM2022-06-06T11:16:56+5:302022-06-06T11:21:23+5:30

Aashram 3:'रंग दे बसंती'नंतर चंदन यांनी विशाल भारद्वाज यांच्या 'कमीने' या चित्रपटात शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती.

सध्या सोशल मीडियावर बॉबी देओलच्या आश्रम 3 या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु आहे. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या या सीरिजच्या पहिल्याच भागाने धुमाकूळ घातला होता.

या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक या सीरिजच्या नवनवीन भागांची वाट पाहत होते. यात नुकताच आश्रम ३ प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या सीरिजमधील प्रत्येक कलाकार सध्या चर्चेत आहेत.

या सीरिजमध्ये ज्याप्रमाणे बाबा निरालाची भूमिका गाजत आहे. तशीच आणखी एक भूमिका गाजत आहे ती म्हणजे भोपा स्वामी यांची.

निराला बाबाप्रमाणेच प्रेक्षकांना भोपा स्वामीचीही भूमिका चांगलीच आवडली. त्यामुळे ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

३० फेब्रुवारी १९८० मध्ये दिल्लीतील एका बंगाली कुटुंबात चंदन यांचा जन्म झाला. दिल्लीमध्येच लहानाचे मोठे झालेल्या चंदन यांनी झाकीर हुसैन कॉलेजमधून मॅथमॅटिक्समधून पदवी घेतली.

चंदन रॉय यांनी रंग दे बसंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यांची लहानशी भूमिका होती.

रंग दे बसंती नंतर चंदन यांनी विशाल भारद्वाज यांच्या कमीने या चित्रपटात शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती.

चंदन यांनी जज्बा, जब हॅरे मेट सेजल, शेफ, बँगिस्तान, जबरियाँ जोडी, सनक या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

रे, भ्रम, फॉर्बिडन लव, मै हीरो बोल रहा हूं या वेब सीरिजमध्येही ते झळकले आहेत.

आश्रंम ३ प्रमाणेच चंदन आश्रम ४ मध्येही झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.