डीप नेक गाऊन, जॅकेट अन्...; IIFA अवॉर्डसाठी छाया कदम यांचा ग्लॅमरस लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:14 IST2025-03-11T16:11:01+5:302025-03-11T16:14:19+5:30

आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी छाया कदम यांनी प्रिंटेड डीप नेक गाऊन परिधान केला होता.

नुकतंच आयफा पुरस्कार २०२५ सोहळा (iifa awards 2025) पार पडला. या सोहळ्याला अभिनेत्री छाया कदम यांनीदेखील हजेरी लावली होती.

या अवॉर्ड सोहळ्यासाठी छाया कदम यांनी ग्लॅमरस लूक केला होता. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी छाया कदम यांनी प्रिंटेड डीप नेक गाऊन परिधान केला होता.

बन हेअरस्टाइल करत आणि कानात मोठे कानातले घालत त्यांनी खास लूक केल्याचं पाहायला मिळालं.

या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते छाया कदम यांच्या नखांनी...त्यांनी नखांवर नेल कफ्स घातल्याचं दिसलं.

लापता लेडिज या सिनेमासाठी छाया कदम यांनी आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

छाया कदम यांनी सैराट, झुंड, न्यूड, मडगांव एक्सप्रेस यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.