Coronavirus: कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह कनिका कपूरचे सोशल मीडियावर बनलेत मीम्स, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 17:40 IST2020-03-21T17:35:32+5:302020-03-21T17:40:56+5:30
Kanika Kapoor

नुकतेच बॉलिवूडची गायिका कनिका कपूर हिला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे.
त्यात आता तिच्या बेजबाबदारपणामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर तिच्यावर मीम्स बनले आहेत.
कनिकाची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ती खूप चर्चेत आली.
कनिकाची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ती खूप चर्चेत आली.
यासोबतच कनिकाच्या अडचणीत वाढ झाली. तिने संवेदनशील गोष्ट लपवल्याचा तिच्यावर आरोप लावला आहे.
या कारणामुळे आता उत्तर प्रदेशचे योगी सरकार कनिकावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहेत.
तर उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंग यांनी म्हटले की, कनिका कपूरने परदेशातून भारतात परतल्यानंतर नियमांचे उल्लंघन केले आहे.
कोरोना व्हायरसने पीडित असलेली कनिका कपूरच्या विरोधात लखनऊच्या डीएम अभिषेक प्रकाश यांनी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.