Coronavirus: Richa Chadha and Ali Fazal gave each other company during lockdown
Coronavirus: लॉकडाउनदरम्यान रिचा चड्ढा व अली फजलने एकमेकांना अशी दिली कंपनी By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 05:32 PM2020-03-25T17:32:39+5:302020-03-25T17:42:09+5:30Join usJoin usNext रिचा चड्ढा व अली फजल सध्या कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्व सेलिब्रेटी आपल्या घरी वेळ व्यतित करत आहेत. अशात अभिनेत्री रिचा चड्ढाने पुस्तक वाचत असल्याचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘मत किसी मसीहे का इंतज़ार करो’ सोशल मीडियावर नुकताच रिचाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात ती अली फजलला व्हिडिओ कॉल करताना दिसत आहे. या व्हिडिओत रिचा चड्ढा अली फजलला सांगतेय की, मला असं वाटतंय की मी अलीला खूप वेळापासून पाहिलेले नाही. सोबतच रिचाने तिला जेवण बनवायला आवडत असल्याचे सांगितले. आणि ती दिवसात तीन वेळा जेवण बनवते. हे ऐकल्यावर अली फजल तिची मस्करी करताना दिसला. पोस्ट शेअर करत रिचाने अलीसाठी एक प्रेमळ मेसेज लिहिला की Be my quarantine! ❤️ @alifazal9 रिचा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. रिचा व अली फजल लवकरच लग्न करणार आहेत.टॅग्स :रिचा चड्डाअली फजलRicha Chadhaali fazal