IN PICS : प्लीज, लग्नाची बोलणी करायला ये..., अभिनेता विजय वर्मा थेट पाकिस्तान-फ्रान्समधून आली लग्नाची मागणी By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 05:40 PM 2022-09-12T17:40:29+5:30 2022-09-12T18:13:19+5:30
Vijay Varma : आलिया भटच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता विजय वर्मा सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. होय, त्याच्यावर तरूणी अक्षरश: फिदा झाल्या आहेत. आलिया भटच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता विजय वर्मा सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. होय, त्याच्यावर तरूणी अक्षरश: फिदा झाल्या आहेत.
विजय वर्माने ‘डार्लिंग्स’ या चित्रपटात अभिनेत्याने आलिया भट्टच्या पतीची भूमिका साकारली होती. म्हणायला त्याची भूमिका निगेटीव्ह होती. पण तरिही तरूणी त्याच्या प्रेमात पडल्या आहेत.
लाखो तरूणी विजयच्या लुकवर भाळल्या आहेत. फक्त भारतातूनच नव्हे तर विदेशातूनही त्याला लग्नाचे प्रस्ताव येत आहेत.
होय. सध्या विजय ‘मिझार्पूर 3’ च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यासाठी तो नुकतंच लखनऊला गेला होता. दरम्यान त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
विजयने हा व्हिडीओ शेअर केला आणि या व्हिडीओनंतर अनेक तरूणींनी त्याला लग्नासाठी मागणी घातली. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा नुसता पूर आला.
अगदी पाकिस्तान, कॅनडातूनही अनेक तरूणींनी विजयला लग्नाची मागणी घातली. प्लीज, माझ्याशी लग्न करशील का? अशा कमेंट्स तुम्ही त्याच्या या व्हिडीओवर पाहू शकता.
प्लीज प्लीज पाकिस्तानमध्ये येऊन, माझ्या आईबाबांकडे आपल्या लग्नाची बोलणी कर, असं एका पाकिस्तानातील तरूणीने त्याच्या व्हिडीओवर कमेंट केली. यावर मजेशीर उत्तर देत विजयने लिहलंय , लखनऊचं शेड्युल पूर्ण करुन पाकिस्तानलाच येतो.
प्लीज फ्रान्सला ये, माझी आई तुझी वाट पाहात आहे,अशी कमेंट एका तरूणीने केली. यावर विजयने मजेशीर उत्तर दिलं. माझ्याच आईबाबांना मला वेळेअभावी भेटता येत नाही, असं त्याने लिहिलं.
विजयने 2012 मध्ये 'चित्तागोंग' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय रंगरेज, गँग ऑफ घोस्ट, पिंक, राग देश, गली बॉय यांसारख्या चित्रपटांतील कामासाठी तो ओळखला जातो.
'मिर्झापूर' या वेब शोमध्ये काम करून विजयने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विजयने पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून अभिनयाचे शिक्षण घेतले.