आदेश बांदेकर ते दिपाली सय्यद! अभिनयासह राजकारणात सक्रीय आहेत 'हे' मराठी कलाकार By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 07:00 AM 2022-06-27T07:00:00+5:30 2022-06-27T07:00:00+5:30
Marathi actors: हिंदी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी आज राजकीय वर्तुळात पाहायला मिळतात. मात्र, यावेळी आपण राजकारणात सक्रीय असलेले मराठी कलाकार कोणते ते पाहुयात. कलाविश्व आणि राजकारण या दोन क्षेत्रांचा तसं पाहायला गेलं तर जवळचा संबंध आहे. आजवर अनेक कलाकारांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला आहे.
हिंदी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी आज राजकीय वर्तुळात पाहायला मिळतात. मात्र, यावेळी आपण राजकारणात सक्रीय असलेले मराठी कलाकार कोणते ते पाहुयात.
आदेश बांदेकर - होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता, सूत्रसंचालक म्हणजे आदेश बांदेकर.
आदेश बांदेकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून ते शिवसेना पक्षाचे सचिव आहेत. तसंच ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनही काम पाहतात.
सुशांत शेलार - बिग बॉस मराठीच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे सुशांत शेलार. अनेकदा फंड गोळा करुन तो गरजूंची मदत करत असतो.
करोना काळात सुशांतने अनेक गरजूंना मदत केली होती. तसंच शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातूनही नवनवीन उपक्रम राबवत असतो.
अमोल कोल्हे- अभ्यासू आणि कसदार अभिनेता म्हणून अमोल कोल्हेंकडे पाहिलं जातं. अमोल कोल्हें यांनी कित्येक वर्ष खासदार म्हणून पद भूषवलं आहे.
अमोल कोल्हे राजकारणाप्रमाणेच कलाविश्वातही सक्रीय आहेत. अनेक मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.
दिपाली सय्यद - दिपाली सय्यद यांनी नुकताच राजकारणात प्रवेश घेतला आहे. काही काळापूर्वीच तिने अभिनयातून ब्रेक घेतला आहे.
राजकारणात सक्रीय झाल्यापासून दिपाली तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहे.
नित्यश्री ज्ञानलक्ष्मी - 'लक्ष्मी' या मालिकेतून नित्यश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु, कलाविश्वात ती फारशी सक्रीय नाही. त्याऐवजी ती राजकारणात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.
ती देखील राजकारणात सक्रिय आहे. ती सध्या एका वेल्फेअर सोसायटी सोबत काम करत आहेत.