प्रियंका चोप्राचा हा अंदाज पाहून फिदा झाले फॅन्स, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 07:22 PM2021-05-24T19:22:32+5:302021-05-24T19:22:32+5:30

प्रियंका चोप्राने तिच्या सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले असून हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

प्रियंकासोबत या फोटोत आपल्याला निक जोनासला देखील पाहायला मिळत आहे. तो देखील खूपच स्टायलिश दिसत आहे.

प्रियंका आणि निक यांनी नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांचा हा अंदाज पाहायला मिळाला.

प्रियंकाचे सौंदर्य या गाऊनमुळे आणखी खुलून आले असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

प्रियंका आणि निकची जोडी खूपच छान दिसत असल्याचे त्यांचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत.

प्रियंका चोप्राने आज बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये देखील तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्रियंका चोप्राचे फॅन्स जगभर असून तिच्या आगामी चित्रपटाची ते आतुरतेने वाट पाहात असतात.

प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.