देसी गर्ल प्रियंका चोप्राने शेअर केले फोटो, ब्लॅक ड्रेसमधून चाहत्यांना केले इंप्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 06:43 PM2020-12-18T18:43:40+5:302020-12-18T18:46:18+5:30

प्रियंका चोप्राने ब्लॅक ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा गायिका, निर्माती आणि २००० सालची मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती आहे.

प्रियंका चोप्रा लोकप्रिय सेलिब्रेटींपैकी एक आहे.

बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही तिने आपले स्थान निर्माण केले आहे.

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर प्रियंकाने इंस्टाग्रामवर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

प्रियंका चोप्राला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअरचे पुरस्कार मिळाले आहेत.

टाइम पेपर्सने प्रियंका चोप्राचे नाव जगातील शंभर प्रतिभावंत लोकांच्या यादीत टाकले होते.

प्रियंका नेहमी सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

ऑस्कर पासून ग्रॅमी अवॉर्डपर्यंत तिच्या स्टाइलची चर्चा होते.(सभी फोटो इंस्टाग्राम)