परदेशात राहूनही 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा जपतेय भारतीय संस्कृती, सासरच्या लोकांसोबत साजरी केली रंगपंचमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 11:50 AM2022-03-19T11:50:23+5:302022-03-19T11:59:09+5:30

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्राने लॉस अँजेलिसमधील तिच्या सासरी नवरा निक जोनाससोबत मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. प्रियंकाने परदेशातील होळीची थोडी झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्राने लॉस अँजेलिसमधील तिच्या सासरी नवरा निक जोनाससोबत मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली.

प्रियंकाने परदेशातील होळीची थोडी झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

प्रियंका चोप्राने लॉस अँजेलिसमधील धुळवडीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या या फोटो आणि व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे.

प्रियंका चोप्रा घरातल्या चिमुकल्यांनाही होळीबद्दल सांगताना दिसत आहे.

प्रियंकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रियांका निकला रोमँटिक पद्धतीने रंग लावताना दिसत आहे.

प्रियंका चोप्राच्या सासरी मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली.

नुकतेच प्रियंका चोप्राच्या घरात एका छोट्या पाहुण्याचेही आगमन झाले आहे. त्यामुळे होळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.

प्रियांका निकच्या होळीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांकडून या फोटो आणि व्हिडीओला पसंती मिळते आहे.