देवमाणूस मालिकेतल्या ACP दिव्या सिंगच्या लेडी दबंग लुकप्रमाणेच मॉडर्न लूकवर देखील चाहते फुल ऑन फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 11:25 IST2021-05-21T11:07:18+5:302021-05-21T11:25:16+5:30
देवमाणूस मालिकेत ACP दिव्या सिंगच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्रीने नेहा खान अल्पाधीतच लोकप्रिय झाली.

अभिनयाइतकीच तिच्या लूकवरही चाहते फिदा होतात.विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.
मालिकेतील दिव्याचा खाकी वर्दीतल्या लुकप्रमाणेच तिच्या मॉडर्न लूकवर देखील चाहते पूर्णपणे फिदा झाले आहेत असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही.
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दिव्या सिंग भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे.
सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो ती शेअर करत असते.
तिची प्रत्येक अदा चाहत्यांसाठी खास असते.
सोशल मीडियावर नजर टाकल्यास वेस्टर्न आणि ट्रेडिशनल लूकमध्ये तिचे फोटो पाहायला मिळतील.
खऱ्या आयुष्यात ती तितकीच ग्लॅमरस असल्याचे तुम्हाला जाणवेल.
तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.