राधिका आपटेने फॉरेनर सोबत थाटलाय संसार, चाहत्यांपासून लपवून ठेवली होती 'ही' गोष्टी, पाहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 06:00 AM2020-07-24T06:00:00+5:302020-07-24T06:00:02+5:30

बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख.

वैयक्तीक असो वा व्यावसायिक कोणत्याही गोष्टीवर आपलं ठाम मत मांडताना ती जराही कचरत नाही. ब-याचदा तिच्या खाजगी आयुष्याबाबत चर्चा रंगत असतात.

राधिकाने लंडनमधील प्रसिद्ध गायक बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे.

विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नाला आता 8 वर्ष झाली आहेत.

राधिका आपटे हिने बरेच दिवस लग्नाची बातमी लपवून ठेवली होती.

शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे ती जास्त वेळ तिच्या कुटुंबियांना देणे तिला शक्य होत नाही.

लॉकडाऊनमध्येच राधिका पहिल्यांदा इतकी पतीसह राहत असावी. मार्च महिन्यात कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवायला सुरूवात केली होती तेव्हा काळजीपोटी लंडनला रवाना झाली आणि पतीसह वेळ घालवताना दिसली.