प्रायव्हेट जेट, आलिशान बंगला, महागड्या गाड्या... राजेशाही थाटात जगतो विजय देवरकोंडा, जाणून घ्या त्याची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 03:49 PM2022-07-16T15:49:40+5:302022-07-16T16:12:37+5:30

Vijay Deverakonda Net Worth:बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश हिरो आहेत. पण विजय देवरकोंडाही कमी स्टायलिश नाही. लाईफ म्हणाल तर फुल्ल अलिशान.

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश हिरो आहेत. पण विजय देवरकोंडाही कमी स्टायलिश नाही. लाईफ म्हणाल तर फुल्ल अलिशान. कधीकाळी याच विजय देवरकोंडाकडे घराचे भाडे द्यायला पैसे नव्हते. आज तो कोट्यवधींचा मालक आहे. (Photo Instagram)

हैदराबादेत त्याचा अलिशान घर आहे. अलीकडे 20 कोटी रूपयांत त्याने हे डुप्लेक्स घर खरेदी केले होते. (Photo Instagram)

या घरात विजय आई-बाबा व भावासोबत राहतो. विजयच्या घराचे फोटो पाहून त्याच्या अलिशान आयुष्याचा अंदाज यावा. (Photo Instagram)

मॉर्डन, क्लासी ड्रॉईंग रूम, लॅव्हिश टेरेस एरिया असा त्याचा थाट आहे. (Photo Instagram)

विजय लॅव्हिश घरात राहतो, अलिशान लक्झरी गाड्यांमधून फिरतो. त्याच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, ऑडी अशा अनेक गाड्या त्याच्याकडे आहेत.(Photo Instagram)

9 मे 1989 रोजी एका तेलगू कुटुंबात विजय देवरकोंडाचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवरकोंडा गोवर्धन राव आणि आईचे नाव माधवी देवरकोंडा आहे.(Photo Instagram)

2011 साली विजयने मध्ये दक्षिण सिनेमातून पदार्पण केले. त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘नुव्विला’ असे होत़े. हा मल्टीस्टारर चित्रपट होता. (Photo Instagram)

विजय देवरकोंडा एका चित्रपटासाठी 10 ते 11 कोटी रुपये घेतात.विजय देवरकोंडाची एकूण संपत्ती 30 कोटी आहे. (Photo Instagram)

यानंतर विजय देवरकोंडाने अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. परंतु ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने खरी ओळख मिळाली. (Photo Instagram)