'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या आईला पाहिलंत का?, लेक अभिनेत्री असूनही राहणीमान आहे साधं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 06:00 AM2022-06-04T06:00:00+5:302022-06-04T06:00:02+5:30

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde)ला खूप लोकप्रियता मिळाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (Ranga Maza Vegla) मालिकेतील दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) घराघरात पोहचली आहे.

रेश्मा शिंदेने दीपाच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकताच रेश्मा शिंदेने आईसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

रेश्मा शिंदेने आईसोबतचा फोटो शेअर करून लिहिले की, कर लो दुनिया 'मिठी' मैं.. आई..फॉरेव्हर लव्ह

रेश्मा शिंदेने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

यापूर्वीही रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये रेश्मा आणि तिच्या आईमध्ये छान बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.

रेश्मा शिंदे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

तसेच रेश्माने तिच्या आई वडिलांसोबतचा फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.