Unlimited Hotness!! ब्लॅक बॉडीकॉन अन् गोल्डन ब्रेसलेट... दिशा पाटनीचं 'बोल्ड' फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 02:17 PM2024-08-29T14:17:35+5:302024-08-29T15:36:10+5:30

Disha Patani Photos: दिशाच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस; कुणी म्हणे 'तूच सौंदर्यवती', तर कुणी घालतंय लग्नासाठी मागणी...

Disha Patani Hot & Bold Photos: बॉलिवूडच्या बोल्ड & ब्यूटिफुल अभिनेत्रींच्या यादीत आघाडीवर असलेल्या नावांपैकी एक म्हणजे दिशा पाटनी. तिच्या अदा कायमच चर्चेचा विषय ठरतात.

दिशा पाटनीच्या फिटनेस आणि हॉटनेसचा सोशल मीडियावरही बोलबाला असतो. प्रत्येक वेळी आपल्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.

टायगर श्रॉफची एकेकाळची गर्लफ्रेंड असलेली दिशा सध्या बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. 'कल्की 2898 एडी' मध्ये दिशाला कमी स्क्रीन टाईम मिळूनही तिने अभिनयाने चांगला प्रभाव पाडला.

दिशा सध्या तिच्या आगामी चित्रपटांची तयारी करत आहे. याचदरम्यान, सोशल मीडियावर तिच्या काही बोल्ड फोटोंनी चाहत्यांवर पुन्हा एकदा मोहिनी घातली आहे.

दिशा अनेकदा शॉर्ट्स कपड्यांमध्ये तिचे ग्लॅमर दाखवते. तिने बीचवर बिकिनीमध्येही आपले कर्व्ही फिगर अन् फिटनेस वेळोवेळी दाखवून दिला आहे.

ताज्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री दिशा पाटनी हिने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घालून काही हॉट फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

कधी नजरेचा कटाक्ष टाकत तर कधी हॉट अँड फिट फिगर फ्लाँट करत दिशाने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

ताज्या फोटोशूटमधील दिशाचा सुपरहॉट लूक चाहत्यांना खूपच आवडलाय. एकाने तिला 'सर्वात सुंदर स्त्री' म्हणलंय तर दुसऱ्याने तिच्या हॉटनेसला काही मर्यादाच नाहीत, अशी कमेंट केलीय. काहींनी तिला थेट लग्नासाठी मागणीही घातलीय.

दिशा लवकरच बॉबी देओलसोबत साऊथच्या 'कंगुआ' या चित्रपटात दिसेल. याशिवाय स्टारकास्टचा भरणा असलेल्या 'वेलकम टू द जंगल'मध्येही दिशा हॉट अवतारात दिसणार आहे.

सर्व फोटो सौजन्य- दिशा पाटनी इन्स्टाग्राम