दिव्या भारती इतकीच सुंदर आहे तिची बहीण, पाहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 08:00 IST2020-05-23T08:00:00+5:302020-05-23T08:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती सुंदर अभिनेत्रींपैकी एक असून तिने तिच्या लूक्स आणि निरागसतेने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तीन वर्षांच्या छोट्या सिने कारकिर्दीत दिव्या भारतीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. वयाच्या १९व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. दिव्याप्रमाणे तिची बहीण देखील अभिनेत्री आहे.
दिव्याच्या अभिनयाचे, सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत. तिच्या इतकीच तिची बहीण देखील अतिशय सुंदर आहे.
सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. तिच्या बहिणीचे नाव कायनात अरोरा असून तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगते.
कायनातने तिच्या बहिणीप्रमाणेच चित्रपटांत देखील काम केले आहे.
खट्टा मिठा या चित्रपटातील आयला रे आयला या आयटम साँगमध्ये कायनात झळकली होती.
कायनातने ग्रँड मस्ती या चित्रपटात देखील काम केले होते.
कायनातने मॉडलिंगद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
कायनात दिव्याची चुलत बहीण असून तिने कॅडबरी, मारूती, लक्स यांसारख्या अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे.
कायनातने हिंदी सोबतच काही मल्याळी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
कायनात अतिशय सुंदर दिसत असल्याचे तिचे चाहते तिला नेहमीच सोशल मीडियाद्वारे सांगत असतात.