Do you know the real age and name of these child actors in Marathi serial
लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणाऱ्या या बालकलाकारांचे खरं नाव आणि वय माहितीय का तुम्हाला?, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:22 PM2022-04-18T13:22:14+5:302022-04-18T19:05:30+5:30Join usJoin usNext सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये बाल कलाकारांचा ट्रेंड सुरु झालाय. प्रत्येक लोकप्रिय मालिकेमध्ये एखाद दुसरा तरी बालकार आहेच. या बालकलाकरांचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहेत. त्यांच्या चाहत्यांना या बालकलाकारांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला या बाल कलाकारांची खरे नाव व वय सांगणार आहोत. मायरा वायकूळ - छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. या बालकलाकार परीने या मालिकेची रंगत वाढवली आहे. विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांमध्ये चिमुकली मायरा तिच्या गोंडसपणामुळे आणि उत्तम अभिनयामुळे भाव खाऊन गेली. त्यामुळेच परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळे आज प्रचंड लोकप्रिय बालकलाकार म्हणून ओळखली जाते. मायरा फक्त पाच वर्षांची आहे. (Photo Instagram) स्पृहा दळी- रंग माझा वेगळा मालिकेत दीपिकाची भूमिका स्पृहा दळी साकारते आहे. शाळा ऑनलाईन असल्यामुळे तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. रंग माझा वेगळा या मालिकेसाठी स्पृहाने ऑडिशन दिली होती, त्यात तिचे सिलेक्शन झाले होते. स्पृहा दळी आठ वर्षांची आहे. स्पृहा अभिनेत्री वेदश्री दळीची मुलगी आहे. विरल माने - देव माणूसमधील टोन्या हा बालकारला चांगलाच चर्चेत आला. टोन्या हा देव माणूस सीजन टूमध्ये देखील काम करतोय. टोन्याचं खरं नाव विरल माने आहे. . अतिशय कमी काळात केवळ आपल्या चुणचुणीतपणा आणि अभिनय यांच्या जोरावर तो लोकप्रिय झाला आहे. विरल हा दहा वर्षांचा आहे अवनी तायवाडे- स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेत स्वराची भूमिका अवनी तायवडे या बालकलाकाराने साकारली आहे. अनवी याअगोदर हिंदी मालिकेतून झळकली आहे. स्टार प्लसवरील ‘ये है चाहतें’ या मालिकेत अन्वीने साचीची भूमिका साकारली होती. अवनी फक्त आठ वर्षांची आहे. हर्षद नायबळ- 'सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर' या कार्यक्रमातून हर्षद घराघरात पोहोचला. हर्षदने त्याच्या गायनकौशल्याने सर्वांना भुरळ घातली. पिंकीचा विजय असो या मालिकेत दिप्याच्या भूमिकेत तो दिसतो आहे. हर्षद नायबळ हा केवळ सहा वर्षांचा आहे. हर्षद याच्याकडे देखील अनेक मालिका आणि चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. अवनी जोशी- अवनीने याआधी स्टार प्रवाहवरील साथ दे तू मला या मालिकेतून अवनीने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. अवनीला गायनाची देखील आवड आहे. आठ वर्षांच्या अवनीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अवनी गायक अनिरुद्ध आणि त्याची रसिका जोशी यांची मुलगी आहे. 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या सूत्रसंचलन करताना अवनी सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसतेय. टॅग्स :झी मराठीस्टार प्रवाहZee MarathiStar Pravah