आठवतेय का 'राम तेरी गंगा मैली'मधली मंदाकिनी? आता दिसते अशी, लवकरच करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 04:51 PM2022-06-23T16:51:31+5:302022-06-23T16:55:55+5:30

Ram Teri Ganga Maili fame Mandakini : राज कपूर यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या सिनेमातील धबधब्याखाली पांढऱ्या साडीत भिजलेल्या मंदाकिनीचा चेहरा आजही चाहत्यांच्या मनात घर करून कायम आहे.

राज कपूर यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या सिनेमातील धबधब्याखाली पांढऱ्या साडीत भिजलेल्या मंदाकिनीचा चेहरा आजही चाहत्यांच्या मनात घर करून कायम आहे.

पण मंदाकिनी कुठे आहे? आता कशी दिसतेस? तुम्हालाही हे प्रश्न पडले असतील ना. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

अभिनेत्री बऱ्याच मोठ्या कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून लांब होती. आता मंदाकिनीला ओळखणं खूप कठीण झाले आहे.

अभिनेत्री मंदाकिनी पुन्हा एकदा आपल्या मनमोहक स्टाईलने लोकांना घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मंदाकिनी तिच्या 'मा ओ मा' या म्युझिक व्हिडीओद्वारे सिनेइंडस्ट्रीत पुनरागमन करत आहे. या गाण्याचे पहिले पोस्टरही आज रिलीज करण्यात आले आहे.

मंदाकिनी आजही तिच्या लोकप्रिय चित्रपट राम तेरी गंगा मैलीसाठी ओळखली जाते. मंदाकिनीने या चित्रपटात इतकं उत्तम काम केलं की आजपर्यंत लोक तिची आठवण काढतात.

आता पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या माँ ओ मा या म्युझिक व्हिडिओद्वारे शोबिझ जगतात प्रवेश करणार आहे.

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या गाण्याचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या गाण्यात मंदाकिनीसोबत तिचा मुलगा रबिल ठाकूरही दिसणार आहे.

माँ ओ मा या गाण्याचे दिग्दर्शन साजन अग्रवाल यांनी केले आहे. या गाण्याचे बोल त्यांनी लिहिले आहेत. या गाण्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.