'सूर्यवंशम'मधील ही अभिनेत्री आठवतेय का?, मृत्यूच्या वेळी होती प्रेग्नेंट, असा झाला तिचा दुर्देवी शेवट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 04:17 PM2023-04-17T16:17:05+5:302023-04-17T16:23:52+5:30

लहानपणीच ज्योतिषाने वर्तवले होते या अभिनेत्रीच्या मृत्यूचं भाकीत

अभिनेते अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम चित्रपट पाहिला आहे, त्यांना त्या चित्रपटात त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नक्कीच आठवत असेल. या अभिनेत्रीचं नाव आहे सौंदर्या रघु.

सौंदर्या रघुची आज पुण्यतिथी आहे. तिच्या निधनाला आज १९ वर्षे झाली. सौंदर्याचं १७ एप्रिल २००४ रोजी अपघाती निधन झाले होते.

सौंदर्या रघुचा जन्म १८ जुलै १९७२ रोजी कर्नाटकमधील कोलारमध्ये झाला होते. तिचे वडील एस सत्यनारायण हे सिनेक्षेत्रात काम करायचे.

घरातील फिल्मी वातावरणामुळे सौंदर्याला लहान वयातच अभिनयाची आवड निर्माण झाली. मात्र, अभिनयाची ओढ असूनही तिने अभ्यास पूर्ण केला.

एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात असताना तिला सिनेमाची ऑफर मिळाली आणि तिने शिक्षण अर्धवट सोडलं. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाचे नाव ‘गंधर्व’ होते. या सिनेमानंतर ती रातोरात स्टार बनली आणि तिला अनेक मोठ्या ऑफर्स मिळू लागल्या.

सौंदर्याने तिच्या करिअरमध्ये अनेक भाषांमध्ये काम केले, पण तिने सर्वाधिक तेलुगू चित्रपट केले. या अभिनेत्रीने जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केले.

तिने कमल हासन आणि रजनीकांत यांसारख्या सुपरस्टार्सबरोबर काम केले. मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तिने ‘सूर्यवंशम’ चित्रपटात काम केले होते.

२००४ मध्ये सौंदर्याने राजकारणातही पाऊल ठेवले. लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपा आणि टीडीपी नेत्यांच्या प्रचारासाठी १७ एप्रिल रोजी बंगळुरूहून आंध्र प्रदेशातील करीमनगर इथं जाण्यासाठी उड्डाण केले होते, परंतु १०० फूट उंचीवर पोहोचताच तिचं विमान कोसळलं.

या अपघातात सौंदर्या, तिचा लहान भाऊ तसेच तेलुगू चित्रपट निर्माते अमरनाथ, भाजपचे युवा नेते रमेश कदम यांचे निधन झाले.

पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका ज्योतिषाने सौंदर्याच्या आकस्मिक निधनाची भविष्यवाणी तिच्या बालपणातच केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या वडिलांनी अनेकवेळा तिची पूजा करून घेतली, पण तिचा अपघातीच मृत्यू झाला.