Doordarshan climbs TRP due to Ramayan and Mahabharat PSC
सगळ्या कार्यक्रमांना मागे टाकते हे कार्यक्रम टिआरपी रेसमध्ये ठरले अव्वल, वाचा टिआरपीचा आकडा By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 05:28 PM2020-04-13T17:28:01+5:302020-04-13T18:46:36+5:30Join usJoin usNext सध्या लॉकडाऊन असल्याने रामायण आणि महाभारत या जुन्या मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. रामायण आणि महाभारत मोठ्या प्रमाणावर लोक पाहात असल्याने दूरदर्शन वाहिनीचा टिआरपी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, सगळ्या वाहिन्यांना मागे टाकत दूरदर्शन वाहिनी सध्या एक नंबरवर आहे. विशेष म्हणजे दूरदर्शन सध्या ग्रामीण भागापेक्षा शहरात अधिक पाहिले जात आहे. दूरदर्शन पाहाणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ६५० टक्के वाढ झाली आहे. जुन्या मालिका दाखवण्याच्या निर्णयाचा दूरदर्शन प्रचंड फायदा होत आहे.टॅग्स :रामायणramayan