अजय देवगणचा 'दृश्यम 2'ची छप्परफाड कमाई, लवकरच 300 कोटी क्लबमध्ये होणार सामील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 16:43 IST2022-12-13T16:17:42+5:302022-12-13T16:43:31+5:30
‘दृश्यम 2’ रिलीज होऊन 25 दिवस झाले आहेत. 25 दिवसांनंतरही हा सिनेमा पाहण्यास लोक गर्दी करत आहेत

अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केलेला ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सस्पेन्स थ्रीलर सिनेमा अजूनही गर्दी खेचतोय.
अजय देवगण (Ajay Devgn) , तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला आहे.
चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर ‘दृश्यम 2’ लवकरच 300 कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे.
Koimoiच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने सोमवारपर्यंत 297.50 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांमध्ये हा सिनेमा 300 कोटींचा आकडा पार करेल.
‘दृश्यम 2’ रिलीज होऊन 25 दिवस झाले आहेत. 25 दिवसांनंतरही हा सिनेमा पाहण्यास लोक गर्दी करत आहेत