Engineers day from sushant singh rajput to vicky kaushal these bollywood actors pursued engineering
Engineer's Day: इंजिनिअरिंगला रामराम करत या सेलेब्सनी पकडली बॉलिवूडची वाट, हे आहेत ते कलाकार By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 03:37 PM2020-09-15T15:37:11+5:302020-09-15T16:11:08+5:30Join usJoin usNext सुशांत सिंग राजपूत अभ्यासात खूप खुशार होता. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेतल्या परीक्षेत तो संपूर्ण भारतात सातवा आला होता. यानंतर सुशांतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग (आता दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी) मधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू केला. मात्र इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात त्याने शिक्षण सोडून अभिनय सुरु केला. कार्तिक आर्यन केवळ चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मुंबईत आला होता पण त्यासाठी त्याने प्रथम अभियांत्रिकीचे प्रवेश घेतले जेणेकरून पालकांना वाटेल की आपण अभ्यास करणार आहोत. कार्तिकच्या आईने स्पष्टपणे सांगितले होते की, पदवी घेतल्याशिवाय चित्रपटांमध्ये काम करण्याचा विचारही करु नकोस. कार्तिककडे बायोटेक्नॉलॉजी पदवी आहे क्रिती सनॉनकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक पदवी आहे. विक्की कौशलने वर्सोव्याच्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून दूरसंचार विषयात अभियांत्रिकी पदवी घेतली आहे तापसी पन्नूकडे कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री घेतली आहे. बॉलिवूडमध्ये येणाऱ्यापूर्वी तापसीने दिल्लीच्या गुरू तेगबहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून अभियांत्रिकीची पदवी घेतली. रितेश देशमुखने मुंबईतील कमला रहेजा कॉलेज व आर्किटेक्चरमधून आर्किटेक्चर अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. आर माधवन आयआयटी मद्रासमधून त्यांने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. अमीषा पटेलने बायो-जेनेटिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर अमेरिकन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली.Read in Englishटॅग्स :सुशांत सिंग रजपूतक्रिती सनॉनतापसी पन्नूरितेश देशमुखSushant Singh Rajputkriti SonnenTaapsee PannuRitesh Deshmukh