प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली अभिनेत्री,चाहते करतायेत कायली जेनरसह तुलना By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 01:00 PM 2021-06-24T13:00:37+5:30 2021-06-24T13:10:48+5:30
चित्रपटांची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही ईशा गुप्तानं आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं... यावर्षी जन्नत-टू आणि राज थ्री सिनेमात तिला संधी मिळाली.प्रकाश झाच्या चक्रव्यूह सिनेमातही तिनं आपली छाप पाडली. बघता बघता ईशा गुप्ताही चाहत्यांची फेव्हरेट अभिनेत्री बनली. ईशाचाही मोठा चाहता वर्ग आहे. सुंदर दिसण्यासाठी ईशा गुप्ताही वेगेवेगळ्या गोष्टी करताना दिसते.
आतापर्यंत योगा आणि वर्कआऊट करताना ती दिसली. फिटनेसच्या बाबतीत इतरांनाही जागृत करताना दिसली.
आता अभिनेत्रीने अधिक सुंदर दिसण्यासाठी थेट चेहऱ्यावर सर्जरीच केली आहे.
सर्जरीमुळे तिच्या लूकमध्येही बदल झाला आहे.
सर्जरी करत नवीन लुक मिळवण्याचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाढला आहे.
यात आता बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताचाही समावेश झाला आहे.
सर्जरीनंतर तिने तिचा पहिला लूक सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला.
चेहऱ्यात झालेल्या बदलामुळे चाहतेही काहीवेळासाठी संभ्रमात पडले होते.
चेहऱ्यावर सर्जरी केल्यामुळे तिला काहींनी ओळखलेच नाही तर काहींना तिचा हा नवीन लूक रुचला नाही.
तर काही चाहत्यांनी तिची तुलना थेट कायली जेनरस केली आहे.