ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:33 PM2024-09-21T16:33:07+5:302024-09-21T16:40:53+5:30

८०-९०च्या दशकात एका सुपरस्टारच्या मुलाने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. मात्र त्याला सिनेइंडस्ट्रीत अपयश मिळाले. आता तो सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा जबरदस्त स्टाइल आणि अनोख्या स्टाइलच्या दमदार अभिनयाची चर्चा होते तेव्हा सुपरस्टार राज कुमार यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. एक काळ असा होता जेव्हा चित्रपटात राजकुमार यांची उपस्थिती हा चित्रपट हिट होण्याची हमी मानली जात होती.

राजकुमार यांच्या अभिनय शैलीवर लाखो प्रेक्षक फिदा झाले होते. पण राजकुमार यांनी मिळवलेली कीर्ती आणि यशाचा एक अंशही त्याच्या मुलांना मिळवता आला नाही. राजकुमार यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता पुरू राजकुमारने सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे अखेर सिनेसृष्टी सोडली.

बॉलिवूडचे सुपरस्टार राजकुमार यांचा मुलगा पुरू राजकुमार यालाही फिल्म इंडस्ट्रीत एंट्री मिळाली आणि अनेक संधी मिळाल्या पण तो स्वत:ला सिद्ध करू शकला नाही.

पुरू राजकुमारचे खरे नाव पुरू राव पंडित आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना त्याने वडिलांचे नावही जोडले. त्याला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते आणि त्यासाठी खूप आधीपासून तयारी केली होती.

१९९६ मध्ये त्याने ब्रह्मचारी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. प्रकाश मेहराच्या या चित्रपटात पुरू राजकुमारसोबत करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत होती पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

यानंतर पुरूने रघुवंशी चित्रपटात मनीषा कोईराला आणि रझा मुराद या कलाकारांसोबत काम केले. मात्र, हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. रखडलेला हा एकमेव चित्रपट नव्हता. त्याचप्रमाणे पुरू राजकुमारचा देश और सरहद हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच थंड बस्त्यात गेला.

त्याची कारकीर्द डळमळीत असली तरी त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पुरू राजकुमार हमारा दिल आपके पास है, मिशन कश्मीर आणि खतरों के खिलाडी यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला.

याशिवाय एलओसी कारगिल आणि दुश्मन, वीर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने वेगवेगळ्या छटांची भूमिका साकारली होती.

याशिवाय एलओसी कारगिल आणि दुश्मन, वीर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने वेगवेगळ्या छटांची भूमिका साकारली होती.