Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce : घटस्फोटाआधीच हार्दिक पांड्याने केला मोठा गेम, नताशा नाही तर या व्यक्तीच्या नावावर केलीय प्रॉपर्टी By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 11:08 AM 2024-07-19T11:08:35+5:30 2024-07-19T11:15:26+5:30
Hardik Pandya-Natasa Divorce : लग्नाच्या चार वर्षांनंतर हार्दिक आणि नताशा वेगळे झाले आहेत. आता घटस्फोटानंतर हार्दिकच्या संपत्तीचा मोठा हिस्सा नताशाच्या वाट्याला जाऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. नताशा स्टेन्कोविकशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याला त्याच्या एक्स पत्नीला भरपाई म्हणून मोठी रक्कम द्यावी लागू शकते.
अहमदाबाद मिररच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की घटस्फोटानंतर हार्दिकला त्याच्या संपत्तीतील ७० टक्के भाग नताशाला द्यावा लागेल अशी चर्चा रंगली आहे.
आता अशा परिस्थितीत हार्दिककडे किती कोटींची संपत्ती आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा क्रिकेटर एकूण ९१ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.
हार्दिकचे मुंबईत ३० कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. याशिवाय त्यांचे वडोदरा येथे एक आलिशान घर आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत.
अफवांच्या मते, जर हार्दिकला त्याच्या संपत्तीतील ७० टक्के रक्कम त्याच्या एक्स पत्नीला द्यावी लागली तर त्याला एकूण ६२ कोटी रुपयांचे नुकसान होईल.
पण एक मजेशीर गोष्ट म्हणजे घटस्फोटापूर्वीही हार्दिक पांड्याने त्याच्या संपत्तीतील ५० टक्के रक्कम दुसऱ्याच्या नावावर केली होती.
नुकताच त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. ज्यामध्ये तो सांगतो की त्याने त्याच्या घरापासून त्याच्या कारपर्यंत सर्व काही त्याच्या आईच्या नावावर केले आहे.
व्हिडिओमध्ये हार्दिक म्हणतो की, माझा काही नेम नाही, त्यामुळे मी माझ्या नावावर काहीही ठेवणार नाही. पुढे जाऊन मला पन्नास टक्के इतर कोणाला द्यायचे नाहीत. हे मला खूप टोचेल.
गेल्या काही दिवसांपासून नताशा आणि हार्दिक यांच्या वेगळे झाल्याची चर्चा सुरू होती. अखेर काल त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते विभक्त झाल्याचे जाहीर केले.