PICS : डेब्यूआधीच शालिनी पांडेची चर्चा, फोटो पाहाल तर आलिया-अनन्याला विसराल...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 17:31 IST2021-09-23T17:26:07+5:302021-09-23T17:31:56+5:30
शालिनी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. रणवीर सिंगसोबत ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

साऊथच्या ‘अर्जुन रेड्डी’ या सिनेमातील एक चेहरा विसरता येण्यासारखा नाही. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री शालिनी पांडे हिच्याबद्दल. ‘अर्जुन रेड्डी’ या सिनेमात शालिनी लीड भूमिकेत होती.
हीच शालिनी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. रणवीर सिंगसोबत ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
पण तूर्तास चर्चा आहे ती शालिनीच्या नव्या फोटोंची. होय, फोटोतील तिच्या गोड चेह-याने सर्वांना वेड लावले आहे.
बॉलिवूड डेब्यूआधीच शालिनीच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. शालिनीचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
हिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या स्टार किड्सही फेल आहेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
शालिनीने आदित्य चोप्राच्या यशराज बॅनरसोबत एक करार केला आहे. त्यामुळे यशराजच्या एकापाठोपाठ एक अशा तीन सिनेमात ती दिसणार आहे.
‘अर्जुन रेड्डी’ हा शालिनीचा पहिला सिनेमा होता. पहिलाच सिनेमा हिट झाला आणि शालिनीही ‘हिट’ झाली.
‘अर्जुन रेड्डी’ या सिनेमात शालिनीसोबत विज देवरकोंडा दिसला होता. या चित्रपटासाठी डबिंगही खुद्द शालिनीनेच केले होते.