IN PICS : पहिलाच सिनेमा फ्लॉप झाला आणि फहाद फासिलने अॅक्टिंगला रामराम ठोकला, पण पुढे...! वाचा, भवर सिंहची स्ट्रगल स्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:03 PM 2022-08-08T14:03:53+5:30 2022-08-08T14:12:23+5:30
Fahadh Faasil Birthday : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमातील भंवर सिंह तुमच्या आठवणीत असेलच. आयपीएस भंवर सिंहला विसरणं तसंही शक्य नाहीच. ही भूमिका साऊथ सुपरस्टार फहाद फासिलने साकारली होती. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमातील भंवर सिंह तुमच्या आठवणीत असेलच. आयपीएस भंवर सिंहला विसरणं तसंही शक्य नाहीच. ही भूमिका साऊथ सुपरस्टार फहाद फासिलने साकारली होती.
‘पुष्पा’तील फहादचा रोल फक्त 15 मिनिटांचा होता. पण या 15 मिनिटांत फहादने असा काही अभिनय केला की, त्याच्या अभिनयावर सगळेच फिदा झालेत.
आज फहादचा वाढदिवस. तो मल्याळम चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. तेलगू व तामिळ सिनेमातही तो सक्रीय आहे आणि आता हिंदी सिनेप्रेमींनाही त्याचं नाव पाठ झालं आहे.
8 ऑगस्ट 1982 रोजी केरळच्या आलप्पुषा येथे फहादचा जन्म झाला. त्याचे वडिल प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक- निर्माता व पटकथाकार आहे. पण याऊपरही अभिनयाच्या दुनियेत करिअर बनवणं फहादसाठी सोप्प नव्हतं.
फहादच्या वडिलांनीच त्याला लॉन्च केलं. पण पहिलाच सिनेमा फ्लॉप झाला. 2002 मध्ये ‘कायथुम दुरथ’ या चित्रपटातून त्याचा डेब्यू झाला होता. त्याच्या वडिलांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.
‘कायथुम दुरथ’ या पहिल्यावहिल्या सिनेमाकडून फहादला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो दणकून आपटला आणि फहादची निराशा झाली. तो इतका निराश झाला की, त्याने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.
होय, अॅक्टिंग सोडून त्याने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि पुढील शिक्षणासाठी विदेशात गेला. अर्थात यादरम्यान असं काही घडलं की, तो पुन्हा अभिनयाकडे वळला.
होय, याचं श्रेय जातं दिवंगत अभिनेता इरफान खानला. होय, शिक्षण सुरू असताना फहादने ‘यूं होता तो क्या होता’ हा इरफानचा सिनेमा पाहिला आणि तो जणू वेडा झाला.
त्याला इरफानचा अभिनय इतका आवडला की, त्याने त्याचे सर्व सिनेमे पाहिले. इतकंच नाही तर इरफानपासून प्रेरणा घेत, पुन्हा अभिनयाच्या दुनियेत कमबॅक केलं.
त्यावेळी मात्र नशीबाने साथ दिली. त्याचे कष्ट फळास आलेत. अनेक चित्रपटात फहाद सपोर्टिंग रोलमध्ये दिसला. पण या भूमिका त्याने अशा काही साकारल्या की, आज फहाद मोठा ब्रँड बनला आहे.
आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये फहादने सुमारे 50 चित्रपटांत काम केलं आहे. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘पुष्पा’ या सिनेमाने फहादला नवी ओळख दिली. त्याची छोटीशी भूमिका चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतली.