five Actors Who Were Childhood Superstars But Not So successful In Lead Roles
लहानपणी टॉप, मात्र मोठेपणी फ्लॉप! आठवतात का 'हे' कलाकार? By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 03:06 PM2018-10-19T15:06:09+5:302018-10-19T16:32:33+5:30Join usJoin usNext अविनाश मुखर्जी- बालिका वधूमधील भूमिका अनेकांच्या लक्षात असेल. पुढे तो इतना करो ना मुझे प्यारमध्ये दिसला. मात्र तिथे त्याला छाप पाडता आली नाही हंसिका मोटवानी- आधी शाका लाका बूम बूममध्ये दिसलेली हंसिका नंतर देस में निकला होगा चांद आणि कोई मिल गयामध्ये दिसली. यानंतर तिनं तेलुगूतील मोठा पडदा गाजवला. मात्र बॉलिवूडमध्ये ती सपशेल अपयशी ठरली. किंशूक वैद्य- शाका लाका बूम बूममधील किंशूकचा अभिनय अनेकांच्या लक्षात राहिला. यानंतर जवळपास दशकभर तो गायब होता. यानंतर एक रिश्ता साझेदारी का या मालिकेतून त्यानं पुनरागमन केलं. मात्र त्याला फार यश मिळालं. साना सईद- कुछ कुछ होता है मधून पदार्पण करणाऱ्या क्युट साना सईदचा अभिनय अतिशय उत्तम होता. हर दिल जो प्यार करेगा आणि बादलमधील तिच्या व्यक्तीरेखादेखील उत्तम होत्या. त्यानंतर ती बाबूल का आंगन छुटे ना आणि लो हो गयी पूजा इस घर की मालिकांमध्ये दिसली. मात्र लहानपणीची कमाल तिला करता आली नाही. श्वेता बसू प्रसाद- श्वेतानं बाल कलाकार म्हणून दमदार भूमिका साकारल्या. कहानी घर घर की आणि करिश्मा का करिश्मामध्ये तिनं सुंदर अभिनय केला. त्यानंतर इक्बालमध्येही तिनं छाप पाडली. मात्र बॉलीवूडमध्ये ती अपयशी ठरली. टॅग्स :टेलिव्हिजनबॉलिवूडTelevisionbollywood