Flashback 2022 : सरत्या वर्षात कुणी घेतला घटस्फोट तर कोणाचा झाला ब्रेकअप...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 05:50 AM2022-12-20T05:50:00+5:302022-12-20T17:45:01+5:30

Flashback 2022 : 2022 हे वर्ष घटस्फोट, ब्रेकअप यामुळेही चर्चेत राहिलं. अनेक सेलिब्रिटी जोड्यांनी या वर्षात आपलं नातं संपवलं...

2022 हे वर्ष घटस्फोट, ब्रेकअप यामुळेही चर्चेत राहिलं. अनेक सेलिब्रिटी जोड्यांनी या वर्षात आपलं नातं संपवलं...

टायगर श्रॉफ व दिशा पाटनी हे दोघं दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. पण याचवर्षात या जोडप्याचा ब्रेकअप झाला. सध्या दिशा तिचा जिम ट्रेनर अलेक्झांडरला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय.

राकेश बापट व शमिता शेट्टी हे दोघे ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले. लोकाना ही जोडी भलतीच आवडली होती. चाहत्यांनी या जोडीचं ‘शारा’ असं नामकरणही केलं होतं. पण याचवर्षी जुलैमध्ये दोघांचं ब्रेकअप झालं.

सोहेल खान व सीमा सजदेह या दोघांनी 1998 साली लग्न केलं. 2000 साली त्यांचा मुलगा निर्वाणचा जन्म झाला. 2011 मध्ये सरोगसीद्वारे दोघंही दुसºया अपत्याचे आईबाबा झालेत. पण अचानक बिनसलं आणि लग्नाच्या 24 वर्षानंतर हे नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं.

महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता नितीश भारद्वाज स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही. नितीश भारद्वाजने पत्नी स्मिता गटेपासून वेगळं होत असल्याचं याचवर्षी जाहिर केलं. या दोघांनाही दोन जुळ्या मुली आहेत.

अभिनेता आमिर अली आणि अभिनेत्री संजीदा शेख हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल. पण आता आमिर अली आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला आहे. जानेवारीमध्ये दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली.

रॅपर यो यो हनी सिंग व त्याची पत्नी शालिनी तलवारचा याचवर्षी कायदेशीर घटस्फोट झाला. हनी सिंगवर त्याच्या पत्नीचे घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासह अनेक गंभीर आरोप होते. शालिनीला पोटगी म्हणून कोट्यवधींची रक्कम मिळाली आहे.

गेल्या चार वर्षांपासून अभिनेता अरबाज खान व मॉडेल जॉर्जिया अँड्रियानी एकमेकांना डेट करत होते. पण अलीकडे त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. अर्थात दोघांनी पब्लिकली याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही.